शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे सामन्यावर सावट?

By admin | Updated: August 5, 2015 23:44 IST

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या टीम इंडियाला भक्कम तयारी म्हणून श्रीलंका बोर्ड अध्यक्ष एकादशविरुद्ध तीन दिवसांचा

कोलंबो : तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या टीम इंडियाला भक्कम तयारी म्हणून श्रीलंका बोर्ड अध्यक्ष एकादशविरुद्ध तीन दिवसांचा सराव सामना उद्या गुरुवारपासून खेळायचा आहे. या लढतीत पाऊस खलनायक ठरण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.पावसामुळे काल भारतीय संघाला इन्डोअर सराव करावा लागला. गुरुवारी देखील हवामान खराब राहणार असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. कर्णधार या नात्याने कोहलीची ही पहिली पूर्ण मालिका ठरणार असल्याने विजयासह करियर सुरू करण्याची त्याची इच्छा आहे. शिखर धवन आणि मुरली विजय हे डावाला प्रारंभ करतील. गोलंदाजीत हरभजन आणि अमित मिश्रा यांचा अनुभव लंकेतील विकेटवर उपयुक्त सिद्ध होऊ शकतो. कोहलीचा फॉर्म सध्या चांगला नाही पण अनेकदा खराब परिस्थितीवर मात करीत चांगल्या खेळाद्वारे त्याने टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. माझा संघ युवा असला तरी चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील, असे कोहलीने आधीच सांगितले आहे.लंका बोर्ड अध्यक्ष एकादशचे नेतृत्व लाहिरु तिरिमाने याच्याकडे आहे. या संघात डावखुरा फलंदाज उपुल थरंगा, कौशल सिल्व्हा, यष्टिरक्षक कुशल परेरा, मध्यमगती वेगवान गोलंदाज लाहिरु गमागे आणि अष्टपैलू सचिन पतिराना हे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. भारतीय संघात लोकेश राहुल किंवा वरुण अ‍ॅरोन यापैकी कुणाला संधी दिली जाते याकडे लक्ष असेल. लंकेतील हवामान आणि खेळपट्टीचा अंदाज ओळखून कोहली पाच वेगवान गोलंदाजांना खेळवू शकतो. गोलंदाजांकडेही चांगल्या कामगिरीद्वारे टीकाकारांची तोंडे बंद करण्याची ही नामी संधी असेल. यादव, अ‍ॅरोनकडून शिस्तबद्ध वेगवान मारा हवा : अरुणकोलंबो : लंकेविरुद्ध १२ आॅगस्टपासून गाले येथे सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीत विजयासाठी उमेश यादव आणि वरुण अ‍ॅरोन यांच्याकडून शिस्तबद्ध वेगवान माऱ्याची अपेक्षा राहील, अशी अपेक्षा टीम इंडियाचे गोलंदाजी कोच भारत अरुण यांनी व्यक्त केली. शिस्तबद्ध मारा करण्यासाठी वेगवान गोलंदाजांना आपली गती नियंत्रित ठेवण्याची गरज आहे का, असा प्रश्न विचारला सता अरुण म्हणाले,‘जे वेगवान मारा करतात तेचुका करतातच. वेगाने गोलंदाजांकडून शिस्तबद्ध मारा हा अ‍ॅक्शन आणि आक्रमकतेवर विसंबून असतो. गोलंदाज वेगवान माराऱ्यासह शिस्तबद्ध मारादेखील करू शकतो. त्यामुळे यादव आणि अ‍ॅरोन यांनी गोलंदाजीत कुठलाही बदल न करता शिस्तबद्ध मारा करावा.’ भुवनेश्वर कुमार फॉर्ममध्ये परतल्यामुळे तामिळनाडूचे माजी वेगवान गोलंदाज राहिलेले अरुण आनंदी दिसले. ते म्हणाले,‘डावखुऱ्या फलंदाजांना चेंडू टाकताना भुवीला त्रास जाणवायचा. चेंडू कसा टाकावा याबद्दल त्याने भरपूर मेहनत घेतली. आता पुन्हा तो आतमध्ये चेंडू वळविण्याचे तंत्र शिकला आहे.’ सध्याच्या गोलंदाजीबद्दल अरुण समाधानी आहेत. ईशांत शर्मा सातत्याने मारा करीत असल्याने अरुण यांच्यामते भारताकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यांनी कसोटी जिंकण्यासाठी पाच गोलंदाज खेळविण्याची कोहलीची बाजू योग्य असल्याचे सांगितले. लंकेत भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही पण अरुण रेकॉर्डला महत्त्व देत नाहीत. ते म्हणाले,‘आधी काय घडले याकडे मी लक्ष देणार नाही. भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रिद्धिमान साहा, आर. अश्विन, हरभजनसिंग, उमेश यादव, ईशांत शर्मा, वरुण आरोन, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा. श्रीलंका बोर्ड अध्यक्ष एकादश : लाहिरु तिरिमाने(कर्णधार), धनंजय डिसिल्व्हा, उपुल थरंगा, मिलिंदा सिरिवर्धने, कुशाल जनित परेरा, स्नेहन जयसूर्या, निसाला तिराका, कासुन रजीता, विश्वा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे, लाहिरु गमागे, धनुष्का गुणतिलेके, सचित पतिराना, निरोशन डिकवेला.(वृत्तसंस्था)