कोलकाता : विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारत-पाक दरम्यान महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. मैदानावर एकमेकांसमोर अडचण निर्माण करणाऱ्या खेळाडूंची सराव सत्रात मात्र मैत्री पाहायला मिळाली. भारताचा आघाडीचा फलंदाज सुरेश रैना व पाकिस्तानचा शोएब मलिक एकमेकांची गळाभेट घेताना व हस्तांदोलन करताना आज दिसले. हा क्षण छायाचित्रकारांनी लगेचच टिपला. रैनाला पाहताच मलिक त्याच्याजवळ गेला व त्याच्याशी गप्पा मारल्या. बांगलादेशवर ५५ धावांनी विजय मिळविल्यानंतर पाकिस्तानने आपल्या काही फलंदाज व गोलंदाजांशिवाय सराव केला. भारताकडून अजिंक्य रहाणे, पवन नेगी यांनी फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला. मलिकने यावेळी आपल्या हातमोज्यांची जोडी स्थानिक गोलंदाज राजीव केशरी याला दिली.
सराव सत्रात दिसली रैना-मलिकची मैत्री
By admin | Updated: March 18, 2016 03:32 IST