शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रैनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही

By admin | Updated: May 3, 2016 03:48 IST

गुजरात लायन्ससाठी त्यांचे सलामीवीर महत्त्वाचे आहेत. ड्वेन स्मिथ, ब्रॅन्डन मॅक्युलम यांच्यासोबत अ‍ॅरॉन फिंचचाही विचार केला तर गेल्या रविवारपर्यंत या फलंदाजांना गोलंदाजी करणे दु:खद

- रवी शास्त्री लिहितो़..गुजरात लायन्ससाठी त्यांचे सलामीवीर महत्त्वाचे आहेत. ड्वेन स्मिथ, ब्रॅन्डन मॅक्युलम यांच्यासोबत अ‍ॅरॉन फिंचचाही विचार केला तर गेल्या रविवारपर्यंत या फलंदाजांना गोलंदाजी करणे दु:खद स्वप्नाप्रमाणे भासत होते. पण, रविवारी पंजाबने गुजरातच्या सलामीवीरांना रोखण्यात यश मिळवले. आगामी लढतींमध्ये पॉवरप्लेदरम्यान या फलंदाजांविरुद्ध काही फिरकीपटूंना गोलंदाजी करताना बघण्याची संधी मिळणार असल्याचे निश्चित. गुजरातला आता दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. त्यांच्या संघात अमित मिश्रा व इम्रान ताहिर यांच्या रूपाने दोन वेगवेगळ्या शैलीचे फिरकीपटू आहेत. दोन्ही लेगस्पिनर असले तरी त्यांच्याकडे वेगवेगळी अस्त्रे आहेत. फलंदाज या दोन्ही फिरकीपटूंना कमी लेखण्याची चूक करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत गुजरातच्या सलामीवीरांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. या दोन्ही संघांदरम्यान गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये संघर्षपूर्ण लढत अनुभवायला मिळाली. त्या वेळी दिल्लीचा कर्णधार झहीर खानने आठव्या षटकापर्यंत गोलंदाजीसाठी अमित मिश्राला पाचारण केले नाही आणि ताहिरलाही संधी दिली नाही. फलंदाजांची आक्रमकता आणि छोटे मैदान याची धास्ती झहीरने घेतली असावी किंवा कदाचित तो स्वत: जबाबदारी सांभाळण्यास इच्छुक असावा. त्याचप्रमाणे शहाबाज नदीममध्ये अन्य कुणाच्या निदर्शनास न आलेली प्रतिभा झहीरने बघितली असावी. स्मिथ व मॅक्युलम मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यात माहिर असलेले फलंदाज आहेत. स्मिथने झहीरच्या पहिल्याच षटकात चार चौकार ठोकले. मॅक्युलमने त्याच्या दुसऱ्या षटकात षटकाराने प्रत्युत्तर दिले. नदीमच्या पहिल्या दोन षटकांमध्ये षटकार ठोकले गेले. गुजरात लायन्सने केवळ चार षटकांमध्ये अर्धशतक फलकावर लावले. त्यामुळे मिश्रा व ताहिर गोलंदाजीला येण्यापूर्वीच दोन्ही फलंदाजांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला होता. या दोन्ही फिरकीपटूंनी त्यानंतर धावगतीवर लगाम घातला. याचा अर्थ सुरेश रैनाकडे दुर्लक्ष करावे, असा होत नाही. गुजरातचा कर्णधार सध्या सर्वोत्तम फॉर्मात नाही, ही वेगळी बाब आहे. टी-२० मध्ये त्याच्यासोबत काहीतरी घडत आहे. या मोसमात तो सहा वेळा झेलचितपासून यष्टिचित आणि क्लीनबोल्डही झाला आहे. प्रत्येक वेळी त्याची बाद होण्याची पद्धत वेगळी होती. गुजरात संघासाठी त्यामुळे परिस्थिती कठीण झाली आहे. ब्राव्हो आणि जडेजा यांनाही फलंदाजीमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. अलीकडच्या कामगिरीच्या आधारावर गुजरातला रोखण्याबाबत दिल्ली संघ आशावादी असेल. झहीर अ‍ॅण्ड कंपनीच्या युवा खेळाडूंनी नारायण व हॉग यांच्यासारख्या गोलंदाजांविरुद्ध शानदार खेळ केला. कुठलाच फटका अपारंपरिक नसल्याचे दिल्ली युवा संघाचे मत आहे. दिल्लीच्या आघाडीच्या सहा फलंदाजांपैकी प्रत्येकाने एकातरी लढतीत उल्लेखनीय योगदान दिले आहे. ब्रेथवेट व मॉरिस यांनीही आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. संघातील सर्वांत महागडा खेळाडू पवन नेगी याला ना फलंदाजीमध्ये ना गोलंदाजीमध्ये छाप पाडता आली आहे, ही विचार करण्यासारखी बाब आहे.(टीसीएम)