ऑनलाइन लोकमत
कोलकाता : सलामीवीर स्वस्तात गमावल्यानंतर जॉर्ज बेली आणि सौरभ तिवारी यांनी ३१ चेंडूंत ४0 धावांची धावांची भागीदारी करताना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाचा डाव सावरला. १0 षटकाअखेर रायजिंग पुणे सुपर जायंट्स संघाने ३ बाद ७0 धावा केल्या होत्या. मोक्याच्या वेळी पुण्याच्या फंलदाजांनी हाराकीरी केल्यामुळे डाव कोसळला. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला तेव्हा १७.४ षटकांत रायझिंग पुणे संघाच्या ६ बाद १०३ धावा झाल्या होत्या. धोनी ८ व आश्विन शून्य धावांवर होते. जॉर्ज बेली २७ चेंडूंत ३ चौकारांसह ३३ आणि इरफान पठाण ८ धावांवर बाद झाले. सलामीवीर अजिंक्य रहाणे ६ चेंडूंत २ आणि उस्मान ख्वाजा १७ चेंडूंत ३ चौकारांसह २१ धावा काढून बाद झाला. तिसऱ्या फलंदाजाच्या रुपात सौरभ तिवारी ११ धावा काढून बाद झाला. कोलकाता नाईट रायडर्सकडून शकीब अल हसन, आंद्रे रसेल आणि अंकित राजपूत यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. तर चावलाने २ फलंदाज तंबूत झाडले.