शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

'लाल' बादशाह यंदा फ्रेंच ओपन नाही खेळणार, राफेल नदाल २०२४ मध्ये कारकीर्दिचा शेवट करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 23:35 IST

'लाल' बादशाह राफेल नदालने फ्रेंच ओपन २०२३ स्पर्धेतून माघार घेतली आहे. गुरुवारी मोविस्टारच्या राफा नदाल अकादमीमध्ये त्याने ही घोषणा केली.

'लाल' बादशाह राफेल नदालने फ्रेंच ओपन २०२३ स्पर्धेतून माघार घेतली आहे. गुरुवारी मोविस्टारच्या राफा नदाल अकादमीमध्ये त्याने ही घोषणा केली. २००५मध्ये टूर्नामेंटमध्ये या स्पर्धेत पदार्पण केल्यानंतर १४वेळचा चॅम्पियन ठरलेला राफेल नदार प्रथमच फ्रेंच ओपन स्पर्धेत खेळणार नाही. २२वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या नदालने यावेळी २०२४ हे कदाचित त्याच्या कारकीर्दिचे शेवटचे वर्ष असेल, असे संकेतही दिले.  नदाल म्हणाला, "गेल्या चार महिन्यांपासून मी तंदुरुस्तीसाठी दररोज शक्य तितकी मेहनत घेत होतो. हे खूप कठीण महिने होते कारण मला ऑस्ट्रेलियात असलेल्या समस्येवर तोडगा काढता आला नाही. आज मी अजूनही अशा स्थितीत आहे की फ्रेंच ओपन स्पर्धेत खेळण्यासाठी मी स्वतःला तंदुरुस्त समजत नाही. फ्रेंच ओपनमध्ये सहभाग घेऊन फक्त खेळायचे म्हणून खेळत राहणारा मी व्यक्ती नाही. मला ते आवडतही नाही.'' 

३६ वर्षीय खेळाडूने जानेवारीत पार पडलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेनंतर त्याने अन्य सप्र्धेत सहभाग घेतला नाही. तिथे त्याला डाव्या पायाच्या स्नायूला दुखापत झाली होती. नदाल आणि त्याच्या संघाला सहा ते आठ आठवड्यांत तंदुरुस्त होण्याची अपेक्षा होती, परंतु तसे झालेले नाही. मागच्या वर्षी त्याने ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. पण, आता शारीरिक तंदुरुस्तीच्या समस्येमुळे खेळाचा आनंद लुटता येत नसल्याचे नदाल म्हणाला.  

“साथीच्या रोगानंतर, माझे शरीर सराव करण्यास आणि दैनंदिन काम चांगल्या प्रकारे करण्यास सक्षम नव्हते. त्यामुळे मला सराव आणि स्पर्धेचा आनंद घेता आला नाही. खूप वेळा शारीरिक समस्यांमुळे थांबावे लागले आणि खूप वेदना झाल्या. म्हणून मी म्हटलं मला थांबायला हवे. मला थोडा वेळ थांबण्याची गरज आहे. त्यामुळे थांबण्याचा माझा निर्णय आहे. मला माहित नाही की मी प्रॅक्टिस कोर्टवर परत कधी येऊ शकेन, पण मी थोडा वेळ थांबणार आहे. कदाचित दोन महिने, कदाचित दीड महिना, कदाचित तीन महिने, कदाचित चार महिने,''असे नदाल म्हणाला. 

   

टॅग्स :Rafael Nadalराफेल नदालTennisटेनिस