शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आफ्रिकन धावपटूंमध्ये रंगणार ‘शर्यत’; मॅरेथॉनसाठी मुंबईकर सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 05:46 IST

भारतीय गटामध्येही मोठी चुरस

मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनची चुरस रविवारी पहाटे ५.१५ वाजल्यापासून रंगणार असून भारतीय गटामध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. त्याचवेळी, एलिट गटामध्ये इथियोपिया आणि केनिया या आफ्रिकन देशातील धावपटूंमध्ये मुख्य स्पर्धा रंगेल.

यंदाचे १७वे वर्ष असलेल्या या प्रतिष्ठेच्या मॅरेथॉनमध्ये सुमारे ५५, ३२२ धावपटूंनी सहभाग निश्चित केला आहे. यामध्ये ९,६६० मुख्य मॅरेथॉन आणि १५ हजार २६० धावपटू अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी होती. त्याचप्रमाणे, खुली १०किमी रन (८,०३२), ड्रीम रन (१९,७०७), वरिष्ठ नागरिक रन (१,०२२), दिव्यांग (१,५९६) व पोलीस कप (४५ संघ) अशा इतर गटांमध्येही शर्यत रंगेल.

एकूण ४ लाख २० हजार यूएस डॉलर किंमतीची बक्षिस रक्कम असलेल्या या मॅरेथॉनमध्ये मुख्य स्पर्धेतील पहिल्या तीन धावपटूंना अनुक्रमे ४५ हजार, २५ हजार आणि १७ हजार डॉलरचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. अव्वल तीन भारतीय धावपटूंना अनुक्रमे ५, ४, व ३ लाख रुपयांचे बक्षिस मिळेल.

४२ किमी मुख्य मॅरेथॉन एलिट गटात इथियोपियाच्या आयले अ‍ॅबशेरो याची २ तास ४ मिनिट २३ सेकंदाची वेळ सर्वोत्तम आहे. यानंतर त्याचाच देशबांधव अबेरा कुमा याची २ तास ५ मिनिटे ५० सेकंदाची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळे अ‍ॅबशेरोकडे मुंबई मॅरेथॉनचा संभाव्य विजेता म्हणून पाहिले जाते. मात्र प्रत्यक्षात एलिट धावपटूंची कामगिरी कशी होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महिलांच्या गटात अमाने बेरिसो (इथिओपिया), वर्कनेस अलेमू (इथिओपिया), रोदाह जेपकोरिर (केनिया) व शैला जेरोटिच (केनिया) यांच्यात झुंज रंगेल. अलेमू गतविजेती असून तिच्याकडे जेतेपद कायम राखण्याचे आव्हान असेल.मॅरेथॉन वेळापत्रकमुख्य मॅरेथॉन (हौशी) : पहाटे ५.१५ वाजता. सीएसएमटी येथून.मुख्य मॅरेथॉन (एलिट) : सकाळी ७.२० वाजता. सीएसएमटी येथून.अर्ध मॅरेथॉन : पहाटे ५.१५ वाजता. वरळी डेअरी येथून.१० किमी रन : पहाटे ६.२० वाजता. सीएसएमटी येथून.रशपाल सिंगकडे नजरभारतीय धावपटूंमध्ये रशपाल सिंगकडे सर्वांचे लक्ष असेल. भारतीय एलिट धावपटूंमध्ये त्याची २:१९.१९ अशी सर्वोत्तम वेळ असून त्याला राहुल पाल (२:२१.४१) आणि श्रीनू बुगाथा (२:२३.५६) यांच्याकडून कडवे आव्हान मिळेल. महिलांमध्ये आॅलिम्पियन सुधा सिंग संभाव्य विजेती मानली जात असून तिला महाराष्ट्राच्या ज्योती गवतेकडून तगडे आव्हान मिळेल.

टॅग्स :Mumbai Marathonमुंबई मॅरेथॉन