शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

आरसीबीवर भारी पडला पंजाबी ‘भांगडा’

By admin | Updated: April 11, 2017 04:07 IST

गोलंदाजांच्या अचूक कामगिरीनंतर हाशिम आमला आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या धडाक्याच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएल १० मधील सलग दुसरा

इंदूर : गोलंदाजांच्या अचूक कामगिरीनंतर हाशिम आमला आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या धडाक्याच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएल १० मधील सलग दुसरा विजय मिळवताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा धुव्वा उडवला. आरसीबीने दिलेल्या १४९ धावांचा पाठलाग करताना पंजाबने केवळ २ फलंदाज गमावून १४.३ षटकांतच विजय मिळविला.होळकर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हाशिम आमलाने जबरदस्त ‘हमला’ केल्याने पहिल्या डावातील एबी डिव्हिलियर्सची वादळी खेळी मागे पडली. आमलाने ३५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकार ठोकून नाबाद ५८ धावा कुटल्या. तसेच, कर्णधार ग्लेन मॅक्सवेलनेही वाहत्या गंगेत हात धुऊन घेताना २२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४३ धावांचा चोप देत पंजाबचा सलग दुसरा विजय साकारला.मनन वोहरा आणि आमला या सलामी जोडीने पहिल्या षटकापासूनच आक्रमक पवित्रा घेत आपला इरादा स्पष्ट केला. या दोघांच्या फटकेबाजीपुढे आरसीबीचे सर्वच गोलंदाज हतबल दिसत होते. या दोघांनी सहा षटकांत १०हून अधिक सरासरीने धावा फटकावून आरसीबीच्या आव्हानातली हवा काढली. वोहरा २१ चेंडूंत ३४ धावा काढून परतला. आमला-मॅक्सवेल जोडीने पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी, अडखळत्या सुरुवातीनंतर संघाला समाधानकारक मजल मारून देताना धडाकेबाज एबी डिव्हिलियर्सने चौफेर फटकेबाजी केली. त्याने अखेरच्या काही षटकांत केलेल्या तुफानी फलंदाजीमुळे पंजाबचे गोलंदाज प्रचंड दबावाखाली दिसले. विशेष म्हणजे, ९ षटकारांची आतषबाजी करताना डिव्हिलियर्सने तीन वेळा चेंडू स्टेडियमबाहेर भिरकावला. अक्षर पटेल, संदीप शर्मा आणि वरुण अ‍ॅरोन यांनी प्रत्येकी एक बळी घेऊन आरसीबीच्या फलंदाजीला खिंडार पाडले होते. नाणेफेक जिंकून कर्णधार शेन वॉटसनने घेतलेला फलंदाजीचा निर्णय चांगलाच अंगलट आला. सामन्यातील पहिले षटक टाकणाऱ्या फिरकीपटू अक्षरने सुरुवातीलाच झटका देताना कर्णधार वॉटसनला त्रिफळाचीत केले. कर्णधार बाद झाल्यानंतर डिव्हीलियर्सने काही अप्रतिम फटके मारून २ चौकार व एक उत्तुंग षटकार ठोकून पाठीराख्यांना नाराज केले नाही. मात्र, विष्णू विनोद आणि आक्रमक केदार जाधव पाठोपाठ बाद झाल्याने आरसीबीचा डाव ३ बाद २२ धावा, असा घसरला.डिव्हिलियर्सने यानंतर जम बसल्यावर ४६ चेंडूंत ३ चौकार आणि तब्बल ९ षटकारांचा पाऊस पाडताना नाबाद ८९ धावांची वादळी खेळी केली. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : २० षटकांत ४ बाद १४८ धावा (एबी डिव्हिलियर्स नाबाद ८९, मनदीपसिंग २८; वरुण अ‍ॅरोन २/२१) पराभूत किंग्ज इलेव्हन पंजाब : १४.३ षटकांत २ बाद १५० धावा (हाशिम आमला नाबाद ५८, ग्लेन मॅक्सवेल नाबाद ४३; टायमल मिल्स १/२२, यजुवेंद्र चहल १/२९).