नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण महिला खेळाडू आणि खेळाचा प्रचार करणार आहे. भारतात खेळाडूंची संख्या वाढविणे आणि खेळाप्रति ओढ निर्माण करणे हा यामागील मुख्य हेतू आहे. क्रीडा साहित्यनिर्मितीत आघाडीवर असलेल्या नाईकेने ही जाहिरात तयार केली आहे.तीन मिनिटांच्या या दृक्श्राव्य जाहिरातीत हॉकीपटू राणी रामपालसह फुटबॉलपटू ज्योती आन बुरेट, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि शुभलक्ष्मी शर्मा यांचा समावेश आहे. खेळाला आयुष्याचा भाग बनवा, असे आवाहन या जाहिरातीत करण्यात आले आहे.
दीपिका करणार खेळाचा प्रचार
By admin | Updated: July 12, 2016 03:25 IST