शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

Kabaddi League Auction : लिलावात सेट झाला नवा विक्रम, 8 खेळाडू 'करोडपती'; सर्वात महागडा खेळाडू कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 10:08 IST

इराणच्या खेळाडूशिवाय अन्य काही खेळाडूंसाठीही वेगवेगळ्या संघांनी कोट्यवधींची बोली लावली. प्रो कबड्डीच्या यंदाच्या लिलावात एकूण 8 खेळाडू कोट्याधीश झाले. हा एक नवा विक्रमच आहे.  

Pro Kabaddi League 11: प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) च्या 11 व्या हगामासाठी झालेल्या लिलावात नवा विक्रम सेट झाला आहे. या लिलावाची सुरुवात इराणच्या मोहम्मदरेझा शादलूसह सुरु झाली. ज्याला हरियाणा स्टीलर्सनं २ कोटींपेक्षा अधिक रक्कम मोजून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. 

८ खेळाडू झाले 'करोडपती'

इराणच्या खेळाडूशिवाय अन्य काही खेळाडूंसाठीही वेगवेगळ्या संघांनी कोट्यवधींची बोली लावली. प्रो कबड्डीच्या यंदाच्या लिलावात एकूण 8 खेळाडू कोट्याधीश झाले. हा एक नवा विक्रमच आहे.  

सर्वात महागडा खेळाडू कोण? 

सचिन तन्वर हा प्रो कबड्डी लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्याशिवाय पवन कुमार सेहरावत, सुनील कुमार आणि गुमान सिंह यांनाही तगडी रक्कम मिळाल्याचे पाहायला मिळाले.  

प्रो कबड्डी लीगच्या मागील दोन हंगामातील सर्वात महागडा खेळाडू राहिलेल्या पवन सेहरावत याला यावेळी आघाडीच्या ३ महागड्या खेळाडूंमध्येही स्थान मिळाले नाही. ही गोष्ट यंदाच्या हंगामाआधी लिलावात संघ मालकांनी एक वेगळी रणनितीसह डाव खेळल्याची झलक दाखवून देणारी आहे.

एक नजर लिलावातील सर्वात महागड्या खेळाडूंवर 

  •  सचिन तन्वर - तमिळ थलायवाज संघाने भारतीय रेडर (चढाईपट्टू) साठी २.१५ कोटी रुपये मोजले. तो या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 
  • मोहम्मदरेझा शादलू- इराणच्या या खेळाडूसाठी हरियाणा स्टीलर्सनं २.०७ कोटी रुपये मोजले. तो यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. 
  • गुमान सिंह - गुजरात जाएंट्सनं यू मुम्बाच्या माजी रेडर (चढाईपट्टू) साठी १.९७ कोटी रुपये मोजले. 
  • पवन सेहरावत - तेलुगु टायटन्सनं FBM कार्डचा वापर करत आपल्या माजी कॅप्टनला १.७२५ कोटी रुपयांसह पुन्हा ताफ्यात सामील करून घेतलं. 
  • भरत हूडा - यूपी योद्धाजच्या संघाने बंगळुरु बुल्सच्या माजी खेळाडूला आपल्या ताफ्यात सामील करून घेण्यासाठी १.३० कोटी रुपये खर्च केले. 
  • मनिंदर सिंग - बंगाल वॉरियर्सनं  FBM कार्डच्या माध्यमातून  या खेळाडूवर १.१५  कोटींचा डाव खेळला.  
  • अजिंक्य पवार- बंगळुरु बुल्सनं तमिळ थलायवाजचा माजी  रेडर (चढाईपट्टू) साठी १.१०७ कोटी रुपये मोजले. 
  •  सुनील कुमार - यू मुम्बानं जयपूर पिंक पँथर्सच्या माजी कॅप्टनला आपल्या ताफ्यात सामील करून घेण्यासाठी १.०१५ कोटी रुपये खर्च केले. सुनील आता प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वात महागडा बचावट्टू ठरला आहे. 

टॅग्स :Pro Kabaddi Leagueप्रो कबड्डी लीगPro-Kabaddiप्रो-कबड्डीKabaddiकबड्डी