शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड कपमध्ये प्रो कबड्डी व आशियाई संघातील खेळाडूंना 'No Entry'? 

By स्वदेश घाणेकर | Updated: November 21, 2018 09:12 IST

प्रो लीगने कबड्डी घराघरात पोहोचवली.. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना या लीगने आपलंसं केलं. मात्र या यशासोबत अनेक वादही झाले आणि कबड्डी संघटनांमध्ये फुटीचे बीज रोवले गेले.

ठळक मुद्देपुढील वर्षी मलेशियात होणार कबड्डी वर्ल्ड कप2 ते 15 एप्रिल या कालावधीत होणार 146 सामने प्रो कबड्डी व आशियाई स्पर्धेतील खेळाडूंना संधी नाही

मुंबई : प्रो लीगने कबड्डी घराघरात पोहोचवली.. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना या लीगने आपलंसं केलं. गावाखेड्यातला खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थरावर ओळखला जाऊ लागला. मात्र या यशासोबत अनेक वादही झाले आणि कबड्डी संघटनांमध्ये फुटीचे बीज रोवले गेले. जनार्दन गेहेलोत यांच्या घराणेशाहीला आव्हान देणारी नवी राष्ट्रीय संघटना स्थापन झाली. आंतरराष्ट्रीय स्थरावरही फुटीचे राजकारण सुरु आहे आणि त्याचा फटका प्रो कबड्डी लीगमधील स्टार खेळाडूंना बसण्याची चिन्हे आहेत. नव्याने स्थापन झालेल्या वर्ल्ड कबड्डी फेडरेशने २०१९ मध्ये कबड्डी वर्ल्ड कप घेण्याचे ठरवले आहे. मात्र यात प्रो कबड्डी लीग व आशियाई स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना प्रवेश नाकारण्यात आला आहे. आजी- माजी खेळाडूंनी एकत्र येऊन तयार केलेल्या न्यू कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचा संघ २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये खेळवण्यात येणार आहे. मलेशियातील मेलाका यथे वर्ल्ड फेडरेशनच्या मान्यतेने आणि मलेशिया कबड्डी फेडरेशनच्या यजमानपदाखाली ही वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार २ ते १५ एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. पाच खंडातील ४० देशांतून जवळपास १००० खेळाडू स्पर्धेत खेळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. कॅनडा, भारत, मॉरिशस, इजिप्त, ऑस्ट्रेलिया, केनिया आदी देशांसह ३२ पुरुष व २४ महिला संघ सहभागी होणार आहेत. १४ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत १४६ सामने होणार आहेत. स्पर्धेचे अंतिम रुपरेषा कशी असेल हे अद्याप स्पष्ट नाही. या सर्व सामन्यांच्ये थेट प्रक्षेपण होणार आहे. मात्र, या वर्ल्ड कप स्पर्धेत २०१८ च्या आशियाई  आणि प्रो कबड्डीत खेळलेल्या खेळाडूंना भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. ते सर्व खेळाडू आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाशी संलग्न आहेत आणि त्यांचा व वर्ल्ड फेडरेशन यांच्यात वाद सुरु आहे. 

टॅग्स :Kabaddiकबड्डीPro-Kabaddiप्रो-कबड्डीPKL 2018प्रो कबड्डी लीगAsian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा