शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती चालतात, बीसीसीआय प्रशासक का नाही?

By admin | Updated: June 30, 2017 01:01 IST

भारताच्या राष्ट्रपतिपदी ७० हून अधिक वयाची व्यक्ती विराजमान होऊ शकते, मग बीसीसीआय प्रशासनात अधिक वयाची व्यक्ती काम का करू शकत नाही

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपतिपदी ७० हून अधिक वयाची व्यक्ती विराजमान होऊ शकते, मग बीसीसीआय प्रशासनात अधिक वयाची व्यक्ती काम का करू शकत नाही, असा सवाल अनुभवी प्रशासक निरंजन शहा यांनी केला आहे. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी बीसीसीआयने तयार केलेल्या विशेष समितीत शहा यांना कालच आमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले. बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या वयावरून उद्भवलेला वाद माझ्या आकलनापलीकडचा असल्याचे सांगून शहा म्हणाले, ‘आमचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ८१ वर्षांचे आहेत. ७० हून अधिक वयाचे असले तरी सक्रियपणे काम करतात. बीसीसीआयचे अधिकारी या वयानंतर काम करू शकत नाहीत का. जोवर व्यक्ती जिवंत आणि फिट आहे तोवर ती काम करू शकते. लोढा समितीची वयासंबंधीची शिफारस हा माझ्यामते भेदभाव आहे.’सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये शाह यांचा समावेश करण्यात आल्यानंतर पहिली बैठक शनिवारी होणार आहे. पॅनलमध्ये माझा अनुभव कामी येईल. सर्वच सदस्य आपापली बाजू मांडणार असून कोर्टाला सर्वसंमतीचा तोडगा सोपवायचा आहे, असे शहा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)