शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

धोनीला विकत घेण्यासाठी पॅंट विकायचीही तयारी - शाहरूख खान

By admin | Updated: April 25, 2017 08:01 IST

""मी तर महेंद्रसिंग धोनीला माझा पायजमा विकूनही संघात घेईल पण तो...

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएल सुरू होण्यापुर्वी पुण्याच्या संघाने कर्णधारपदावरून हटवलं. पुण्याचे संघ मालक हर्ष गोयंका यांनी धोनीबाबत केलेले काही ट्विटही वादात राहीले. पण धोनीच्या चाहत्यांवर याचा काहीही परिणाम झाला नाही. शनिवारी(दि.22) झालेल्या सामन्यात मॅचविनिंग खेळी करून धोनीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. धोनीच्या नेतृत्व क्षमतेबाबतही काहींनी प्रश्न उपस्थित केले होते. यादरम्यान अभिनेता आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरूख खानने धोनीवर प्रतिक्रिया देताना धोनीसारख्या नेतृत्वाला  आपल्या संघात घेण्यासाठी पॅंट विकायचीही तयारी असल्याचं म्हटलं आहे. 
 
आयपीएलच्या अकराव्या सत्रात म्हणजे पुढील वर्षी अनेक महत्वाच्या खेळाडूंचा करार संपल्यामुळे पुन्हा लिलाव होणार आहे. धोनीचाही यामध्ये समावेश आहे. चेन्नई सुपरकिंग्स हा संघही पुढील वर्षीपासून पुन्हा एकदा आयपीएलचा हिस्सा असणार आहे. त्यामुळे चेन्नई पुन्हा एकदा धोनीला आपल्याकडे खेचेल अशी चर्चा आहे. पण एकीकडे गौतम गंभीरच्या कर्णधारपदाखाली सुरेख कामगिरी करत असतानाही धोनीला संघात घेण्याची इच्छा शाहरूखने बोलून दाखवली आहे. स्पोर्ट्सवाल्लाह (Sportswallah) ने याबाबत वृत्त दिलं आहे.  ""मी तर धोनीला माझा पायजमा विकूनही संघात घेईल पण तो लिलावामध्ये उपलब्ध व्हायला हवा"" असं शाहरूख खान म्हणाला. यासोबत बंगळुरूवर मिळवलेल्या ऐतिहासीक विजयाचा साक्षीदार होता आलं नाही, दुस-या कामांमुळे तो सामना इडन-गार्डन्सवर जाऊन पाहता नाही आला याचं वाइट वाटत असल्याचंही शाहरूख म्हणाला.  
 
दरम्यान, आता आयपीएलच्या अकराव्या सत्रात चेन्नईचा संघ धोनीला पुन्हा आपल्याकडे घेण्यात यशस्वी ठरतो की शाहरूखचा कोलकात्याचा संघ त्याला आपल्या ताफ्यात घेतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.