शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
2
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
3
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
4
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
5
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
6
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
7
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
8
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
9
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
10
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
11
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
12
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
13
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
14
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
15
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
16
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
17
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
18
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
19
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
20
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मैदानी खेळात Preethi Pal नं रचला इतिहास: बाँझसह भारताच्या खात्यात तिसऱ्या पदकाची भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 17:29 IST

दीपा मलिक हिच्यानंतर मैदानी क्रीडा प्रकारात पदक जिंकणारी ती दुसरी खेळाडू

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत प्रीती पाल हिने ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. महिला १०० मीटर शर्यतीत (T35) तिसऱ्या स्थानावर राहत तिने खास कामगिरीचीही नोंद केली आहे. दीपा मलिक हिच्यानंतर मैदानी क्रीडा प्रकारात पदक जिंकणारी ती दुसरी खेळाडू ठरली आहे. 

नेमबाजीत अवनी लेखरा आणि मोना अग्रवाल यांनी सुवर्ण आणि कांस्य पदकाची कमाई करत भारताचे पदकाचे खाते उघडले होते. त्यानंतर मैदानी क्रीडा प्रकारात प्रीतीनं पदकाला गवसणी घातली. 

२३ वर्षीय प्रीतीनं महिला गटातील (T35) प्रकारातील शर्यतीत १४.२१ सेककंदासह पर्सनल बेस्ट टायमिंग नोंदवत पदक निश्चित केले. चीनच्या झोउ जिया हिने सुवर्ण पदकाची कमाई केली. तिने  १३.५८ सेकंदात १०० मीटर अंतर कापले. चीनच्या  गुओ कियानकियान हिने १३.७४ सेकंदासह रौप्यवर कब्जा केला.

प्रीतीसाठी हे वर्ष एकदम खास राहिले आहे. मार्च २०२४ मध्ये बंगळुरु येथे झालेल्या सहाव्या भारतीय ओपन पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने दोन सुवर्ण पदकांची कमाई केली होती. याशिवाय जपानमध्ये झालेल्या जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतही तिसरे स्थान पटकावले होते. याच कामगिरीच्या जोरावर तिने पॅरिस पॅरालिम्पिकचा कोटा मिळवला होता. आता इथं पदक जिंकून तिने नवा इतिहास रचला आहे.

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धा