शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

प्रणव-सिक्की जोडीची दुसऱ्या फेरीत कूच

By admin | Updated: April 14, 2016 02:53 IST

प्रणव जैरी चोप्रा व एन. सिक्की रेड्डी या भारताच्या मिश्र दुहेरी जोडीने सिंगापूर सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत आपला चमकदार खेळ कायम राखताना दुसरी फेरी गाठली. त्याच वेळी पुरुषांच्या

सिंगापूर : प्रणव जैरी चोप्रा व एन. सिक्की रेड्डी या भारताच्या मिश्र दुहेरी जोडीने सिंगापूर सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत आपला चमकदार खेळ कायम राखताना दुसरी फेरी गाठली. त्याच वेळी पुरुषांच्या एकेरी गटात मात्र भारताचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. मागच्याच आठवड्यात वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेतेपद पटकवलेल्या प्रणव-सिक्की जोडीने इंडोनेशियाच्या इरफान फदहिलाह-वेनी अंग्रेनी या जोडीविरुद्ध २१-१५, २१-१७ असा विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. पुढील फेरीत या भारतीय जोडीसमोर चीनच्या चौथ्या मानांकित शू चेन-मा जिन यांचे कडवे आव्हान असेल.पुरुष एकेरी गटात मात्र पहिलीच फेरी भारतासाठी निराशाजनक ठरली. ज्यांच्यावर पदकांची आशा होती, ते किदांबी श्रीकांत, एचएस प्रणय व अजय जयराम यांना पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले. विशेष म्हणजे आता तिघांचाही रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मार्गही अधिक खडतर झाला आहे. जागतिक क्रमवारीत २२ व्या स्थानी असलेल्या प्रणयला झुंजार खेळानंतरही जगातील अव्वल खेळाडू आणि दोन वेळचा आॅल इंग्लंड चॅम्पियन चीनच्या चोंग लीविरुद्ध २१-१८, १८-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला. एक तास ११ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यात प्रणयने काही अप्रतिम फटके मारताना चोंग लीला झुंजवले. मात्र अखेरीस त्याचा प्रतिकार अपयशी ठरला. दुसऱ्या बाजूला श्रीकांतलाही तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात सू जेन हाओ विरुद्ध पराभूत व्हावे लागले. पहिला सेट जिंकून आघाडी घेतल्यानंतर श्रीकांत दुसऱ्या सेटमध्येही ९-७ असा आघाडीवर होता. मात्र, यानंतर हाओने जबरदस्त पुनरागमन करताना आक्रमक पवित्र घेत श्रीकांतला एकही संधी न देता ११-२१, २१-१८, २१-१८ अशी बाजी मारली. विशेष म्हणजे याआधी झालेल्या इंडिया ओपन आणि मलेशिया ओपन स्पर्धेतही श्रीकांत पहिल्याच फेरीतून बाद झाला होता. (वृत्तसंस्था)ज्वाला-पोनप्पाही फ्लॉप..महिला दुहेरीतील भारताची स्टार जोडी ज्वाला गुट्टा-पोनप्पा यांची निराशाजनक कामगिरी या स्पर्धेतही कायम राहिली. कोरियाच्या गोह आह रा - यू हेइ वोन यांच्याविरुद्ध खेळताना ज्वाला-पोनप्पा १८-२१, १६-२१ असे पराभूत झाले.अन्य एका लढतीत भारताच्या अजय जयरामलाही पहिल्याच फेरीतून आपला गाशा गुंडाळावा लागला. जर्मनीच्या अनुभवी मार्क ज्वेबलरविरुद्ध खेळताना अजयचा दोन सेटमध्येच १७-२१, १६-२१ असा पराभव झाला. दखल घेण्याची बाब म्हणजे, ज्वेबलरविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या ६ लढतींपैकी अजयचा हा ५ वा पराभव आहे.