शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

मारहाण प्रकरणात ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशील कुमार विरोधात पोलिसात FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 10:20 IST

ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी मल्ल प्रवीण राणा समर्थकांमध्ये दिल्लीत झालेल्या हाणामारी प्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे.

ठळक मुद्देगोल्डकोस्ट राष्ट्रकुलसाठी शुक्रवारी इंदिरा गांधी इन्डोअर स्टेडियममध्ये निवड चाचणी रंगली होती.आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये पुनरागमन करणा-या सुशीलने स्वत:चे तिन्ही सामने जिंकले.

नवी दिल्ली - ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी मल्ल प्रवीण राणा समर्थकांमध्ये दिल्लीत झालेल्या हाणामारी प्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. प्रवीण राणाला झालेल्या मारहाण प्रकरणी सुशील कुमार आणि त्याच्या समर्थकांविरोधात एफआयआर दाखल झाला आहे. डीसीपी एमएस रंधावा यांनी ही माहिती दिली.  पोलिसांनी आयपीसीच्या कलम 323 आणि 341 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. 

गोल्डकोस्ट राष्ट्रकुलसाठी शुक्रवारी इंदिरा गांधी इन्डोअर स्टेडियममध्ये निवड चाचणी रंगली होती. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषणसिंग यावेळी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये पुनरागमन करणा-या सुशीलने स्वत:चे तिन्ही सामने जिंकले. पण उपांत्य लढतीत सुशीलकडून पराभूत होताच राणाने, सुशीलविरुद्ध खेळू नये यासाठी प्रतिस्पर्धी समर्थकांनी मला व माझ्या भावाला मारल्याचा दावा केला, शिवाय आगामी प्रो लीगमध्येही खेळण्याची चूक करू नकोस, अशी धमकी मिळाल्याचा आरोप केला.

 

दुसरीकडे सुशीलने लढतीदरम्यान राणाने मारल्याचा आरोप केला. सुशील म्हणाला, ‘राणाने मला मारले पण मला रोखण्याचे त्याचे डावपेच असावेत. खेळाचा हा भाग असावा. याचा मी निषेध करतो. जे झाले ते चुकीचे होते पण मैदानाबाहेर आम्ही एकमेकांचा सन्मान करतो’.

अध्यक्ष बृजभूषण यांनी कानावर हात ठेवत म्हटले, ‘हे प्रकरण रिंगणाबाहेरचे आहे. मी ते पाहिलेले नाही. आम्ही दिल्ली पोलिसांकडे सुरक्षा मागितली होती, पण ती मिळाली नाही. वर्षभरापासून आम्हाला ही शंका होती. औपचारिक तक्रार मिळताच कारवाई होईल.’सुशील राष्ट्रकुलसाठी पात्र

सुशीलकुमार आणि पाच अन्य पुरुष पहिलवानांनी पुढील वर्षी गोल्ड कोस्टमध्ये होणा-या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी आज क्वालिफाय केले आहे़ सुशील (७४ किलो) व्यतिरिक्त फ्री स्टाईलच्या अन्य पहिलवानांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी क्वालिफाय केले आहे़ यामध्ये राहुल आवारे (५७ किलो), बजरंग (६५ किलो), सोमवीर (८६ किलो), मौसम खत्री (९७ किलो) आणि सुमीत (१२५ किलो) यांचा समावेश आहे.

याआधी इंदूर येथे झालेल्या राष्ट्री़य कुस्ती स्पर्धेतही सुशील व प्रवीण आमनेसामने आले होते. मात्र, त्यावेळी प्रवीणने विरोध दर्शवताना सुशील कुमारला वॉकओव्हर दिला होता. या स्पर्धेत सुशीलने बाद फेरी न खेळताच सुवर्ण जिंकले होते.