शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

खेळाडूंना येताहेत ‘अच्छे दिन’; साहित्यासाठी शासनाकडून मिळतेय मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 01:15 IST

- पंकज रोडेकर । खेलो इंडिया या स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळताना ठाणे जिल्ह्यातील खेळांडूनी वैयक्तिक असो वा सांघिक खेळात सर्वोत्तम ...

- पंकज रोडेकर ।खेलो इंडिया या स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळताना ठाणे जिल्ह्यातील खेळांडूनी वैयक्तिक असो वा सांघिक खेळात सर्वोत्तम कामगिरी करून पदकांची लयलूट केली. त्यानिमित्त ठाणे जिल्ह्यातील खेळांडूच्या वतीने ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी स्रेहल साळुंखे-कुदळे यांच्याशी साधलेला संवाद...

खेलो इंडियामध्ये ठाण्याचे किती योगदान होते ?

खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र संघातून ठाणे जिल्ह्यातील विविध खेळाडूंनी वैयक्तिक आणि सांघिक खेळ-खेळताना आपले विशेष योगदान दिले आहे. नुकतीच ही स्पर्धा वेगवेगळ्या प्रकारांत पार पडली आहे. त्यात इतर जिल्ह्यांपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंनी दमदार खेळ करून महाराष्ट्राचा दरारा दाखवून दिला आहे.खेलो इंडियामधील पदकविजेत्यांचा सत्कार झाला का ?

मुळात ही स्पर्धा २६ जानेवारी रोजी खºया अर्थाने संपली आहे. त्यामुळे या स्पर्धेतील पदके जिंकणाºया खेळाडूंचा सत्कार ठाण्यात झालेला नाही. त्या खेळाडूंच्या सत्काराबाबत क्रीडा विभागाकडून कळवल्यावर त्यानुसार, त्यांचा सत्कार केला जाईल. गतवर्षी खेलो इंडिया ही स्पर्धा बालेवाडीत झाल्याने त्यावेळी जिल्हाधिकाºयांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार केला होता.

भविष्यात खेळांबाबत काही विशेष नियोजन आहे का?

विशेष असे काही नियोजन नाही. पण, पाच टक्के कोट्यातून खेळाडूंसाठी नोकरीमध्ये आरक्षण आहे. त्यातच, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये वाढ होत आहे. तर ग्रामपंचायत स्तरावर व्यायामशाळा सुरू करणाºया संस्थांना शासन साहित्यासाठी सात लाख देते. तर, खेळाडूंना शिष्यवृत्तीस्वरूपात पाच हजार, १० हजार अशी रक्कमही मिळत आहे.

ठाणे जिल्ह्यात मैदाने कमी होत आहेत?

ठाण्यात तशी परिस्थिती नाही. परंतु, मुंबईत आहे. क ल्याण आणि त्याच्या पुढील पट्ट्यात कबड्डी, खो-खो हे खेळ खेळले जात आहेत. उल्हासनगर येथे नेमबाजी, ठाण्यात व इतर ठिकाणी जलतरण, पॉवरलिफ्टिंग हे खेळ शालेयस्तरावर खेळले जात आहेत. त्यातून नवीन खेळाडू निश्चितच घडतील.

खेळांमध्ये करिअर आहे का ?

मी स्वत: खेळाडू आहे. खेळातून मी या पदापर्यंत पोहोचले आहे. सद्य:स्थितीत खेळ कमी झाले आहे. त्यातच, पालकवर्ग खेळांमध्ये नोकरी नाही, करिअर नाही असे म्हणतात. मात्र, खेळांना आता चांगले दिवस येत आहेत. खेळाकडे १०० टक्के वेळ दिला नाहीतर किमान ७५ टक्के तो दिल्यास नक्की चांगले दिवस येतील. त्यातून करिअरही घडू शकेल. जसे आयपीएल आणि प्रो-कबड्डी स्पर्धा यांचे उदाहरण देता येईल.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार