शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शून्यातून विश्व निर्माण केलेला फिल हय़ूज

By admin | Updated: November 28, 2014 01:23 IST

फिल हय़ूज दुखापतीतून बरा व्हावा म्हणून अवघं विश्व प्रार्थना करीत असताना तो गेल्याची दुख:द बातमी बाहेर आली आणि अवघ्या क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली.

विनय नायडू - मुंबई
दोन दिवसापूर्वी बाउन्सर डोक्यावर आदळून कोमात गेलेला ऑस्ट्रेलियन फलंदाज फिल हय़ूज दुखापतीतून बरा व्हावा म्हणून अवघं विश्व प्रार्थना करीत असताना तो गेल्याची दुख:द बातमी बाहेर आली आणि अवघ्या क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली. बाउन्सर टाकणा:या गोलंदाजासह कोणीही या क्षणाची अपेक्षा केली नव्हती. क्रिकेटच्या मैदानावर यापूर्वी अनेक जणांचा बळी गेला आहे. (1998 मध्ये फारवर्ड शॉर्टलेगवर फिल्डिंग करणा:या भारतीय खेळाडू रमण लांबा याचाही यात समावेश आहे) पण, बाउन्सरच्या मा:याने कोणताही फलंदाज मृत झाला नव्हता.
ह्युज परिवार शेतकरी आहे. घरची पारंपीरक केळीची शेती. याच शेतात फिल मोठा झाला. शेताच्या मागील बाजूस तो तासन्तास क्रिकेट खेळायचा. अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्त्वाच्या फिलला 18 व्या वर्षी प्रथम श्रेणी संघात निवडण्यात आलं. पुढे दोन वर्षानी तो कसोटी संघात दाखल झाला. त्याने दुस:याच कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन शतके ठोकली. फिलला शॉर्टबॉल खेळणो अडचणीचे ठरत होते. त्याचे तंत्र तितकेसे पक्के नव्हते. त्याच्या याच कमतरतेने त्याची उमलती कारकीर्द नष्ट केली. 
सचिन तेंडुलकरचा तो जबरदस्त चाहता होता. 2009 मध्ये तो सचिनला भेटण्यासाठी नागपूरहून मुंबईला आला होता.  त्यानंतर लगेचच त्याचा कसोटी संघात प्रवेश झाला. 
त्याने आपले पहिले शतक दोन उत्तुंग षटकारांनी पूर्ण केले होते. यामागे सचिनची प्रेरणा असल्याचे नंतर त्याने सांगितले होते. ह्युजचे वैयक्तिक मार्गदर्शक असलेले नेल डि कोस्टा हे त्याकाळात विदर्भ क्रिकेट संघटनेच्या निवासी अॅकॅडमीचे प्रमुख होते.  ‘‘माङया मनात अनेक शंका होत्या. या निरसन करण्यासाठी सचिनशिवाय दुसरा कोणीच नव्हता. तो या क्षेत्रत बरेच वर्षे आहे. मी सचिनशी सविस्तर बोललो.’’ असे त्याने सचिनभेटीनंतर सांगितले होते. 
संघातून तीनदा वगळल्यानंतर पुनरागमनासाठी धडपडणा:या फिलचा 2015 च्या विश्वचषक संघातील समावेश निश्चित मानला जात होता, पण नियतीने निवड समितीचा मनसुबा उधळून लावला.
 
भारताचा माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी फिलच्या मृत्यूच्या पाश्र्वभूमीवर आठवणींना उजळणी देताना 1980 आणि 90 च्या दशकात विंडिजच्या तोफखान्यापुढे आपली कशी भंबेरी उडत होती ते सांगितले. ते म्हणाले, 1982 मध्ये चेन्नईमध्ये खेळताना बॉब विलिसचा एक बाउन्सर मला लागला. माङया डोक्याच्या मागील भागास हा बाउन्सर मला लागला होता. त्यावेळी मी हेल्मेटही घातले नव्हते. 1983 मध्ये अँटिग्वा येथील सामन्यात माल्कम मार्शलच्या बाउन्सरने माङया हेल्मेटचे साईड वायजर मोडले होते. 1984 मध्ये दिल्लीतील कसोटी सामन्यात मार्शलनेच माङो हेल्मेट फोडले होते. बाउन्सरच्या मा:याची शिकार झालेला मी एकटाच होतो असे नाही तर, अनेकांना त्याचा प्रसाद मिळाला आहे. गुयाना येथील कसोटी सामन्यात मार्शलच्या बाउन्सरने सुनील गावसकर यांनाही छेडले आहे. पण असे असले तरी आतार्पयत बाउन्सरने कोणीही बळी पडले नव्हते. पण फिलचा मृत्यू हा दुदैर्वी आणि अविश्वसनीय आहे. 
1962 मध्ये ब्रिजटाउन येथे भारताचे नरी कॉन्ट्रॅक्टर यांना चार्ली ग्रिफिथच्या बाउन्सरने घायाळ केले होते. त्यावेळी सहा दिवसानंतर शुद्धीवर आलेल्या कॉन्ट्रॅक्टर यांना फिलचा मृत्यू चटका लावून गेला आहे. असे काही होवू शकेल असे मला वाटले नव्हते, असे ते म्हणाले.