शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

‘आयपीएल’वरील लोकांचा विश्वास कायम राहील : मुदगल

By admin | Updated: July 15, 2015 01:28 IST

लोढा समितीने चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स यांना निलंबित केल्यामुळे ‘आयपीएल’वरील लोकांचा विश्वास कायम राहण्यास मदत होईल, असे मत

नवी दिल्ली : लोढा समितीने चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स यांना निलंबित केल्यामुळे ‘आयपीएल’वरील लोकांचा विश्वास कायम राहण्यास मदत होईल, असे मत आयपीएलमधील सट्टेबाजीच्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या समितीचे अध्यक्ष मुकुल मुदगल यांनी व्यक्त केले.ही अत्यंत कठोर शिक्षा आहे. यामुळे आयपीएल, बीसीसीआय व खेळाडूंवर चांगला प्रभाव पडेल. अनेक लोकांना वाटते की, यामुळे खेळावर विपरीत परिणाम होईल. मात्र, हा तात्पुरता धक्का असेल, असे मला वाटते. यामुळे क्रिकेटची प्रतिमा उजाळेल व लोकांचा आयपीएलवरील विश्वास कायम राहील.- मुकुल मुदगलजर बीसीसीआयने यापूर्वीच जर कठोर कारवाई केली असती तर अशी परिस्थिती उद्भवली नसती. बीसीसीआयने संथगतीने ही कारवाई केली. हे प्रकरण न्यायालयात जाईल असे त्यांना वाटले नसावे. यातून आपण काही शिकायला हवे.- निरंजन शाह, बीसीसीआयचे माजी सचिव बीसीसीआयमधील कोणीही चुकीच्या कामाबद्दल आवाज उठवला नाही. सर्व प्रकारचे नियम अस्तित्वात आहेत. मात्र, त्यांना काही व्यक्तिंसाठी बदलण्यात आले. मला वाटते आयपीएल सुरू राहिले पाहिजे. मात्र, बीसीसीआयने आयपीएलपासून दूर राहिले पाहिजे. आयपीएलची जबाबदारी एका वेगळ्या संस्थेकडे द्यायला हवी- ए. सी. मुथय्या, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष या दोन्ही संघांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्याच्या निर्णयावर मी सहमत नाही. गुरुनाथ मय्यप्पन व राज कुंद्रा दोषी ठरले होते. संपूर्ण संघ फिक्सिंगमध्ये सहभागी नव्हता. त्यामुळे जोपर्यंत संपूर्ण संघ अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये सहभागी नसतो तोपर्यंत संपूर्ण संघावर अशी कारवाई कशी करता येईल. संपूर्ण आयपीएलसाठी हा निर्णय निराशाजनक असेल असे मला वाटते.’- आर्यमा सुंदरम, बीसीसीआयचे वकीलबीसीसीआयने मयप्पनचे सासरे आयसीसीचे अध्यक्ष श्रीनिवासन यांना आपली भूमिका स्पष्ट करायला सांगायला हवे. चेन्नई सुपरकिंग्ज व मयप्पन यांना वाचवण्यासाठी श्रीनिवासनच जबाबदार आहेत. बीसीसीआयने त्यावेळीच त्यांच्यावर कारवाई करायला हवी होती व त्यांचे आयसीसीचे नामांकन रद्द करायला हवे होते. श्रीनिवासन यांना आयसीसीच्या अध्यक्षपदी राहण्याचा नैतिक अधिकार नाही.- इंद्रजित बिंद्रा, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष ‘आयसीसी’चे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी ‘बीसीसीआय’चे प्रतिनिधित्व करू नये तसेच बीसीसीआयने आयसीसीच्या प्रतिनिधित्वाचे त्यांचे नामांकन रद्द करावे.- आदित्य वर्माक्रिकेटवरील क्रिकेटप्रेमींचा विश्वास कायम राहण्यासाठी जे काही करायला लागेल ते करायला हवे.- संजय मांजरेकर, माजी क्रिकेटपटू न्या. लोढा समितीच्या निकालामुळे स्वच्छ हवा आली आहे. मात्र, अजून खूप गोष्टी शिल्लक आहेत.- बिशनसिंग बेदीक्रिकेटमध्ये भ्रष्टाचार सुरूझाला आहे. ही खूपच खेदजनक बाब आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंसाठी ही दु:खद बाब आहे. - सय्यद किरमाणी