इंचियोन : आशियाई स्पर्धेतून अखेरच्या क्षणी माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारतीय आॅलिम्पिक संघटनेला १० हजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आल्याचे वृत्त आहे; पण अखिल भारतीय टेनिस संघटनेचे प्रमुख अनिल खन्ना यांनी हा दंड रद्द करण्यात येईल, अशी आशा व्यक्त केली. आशियाई स्पर्धेत भारतीय पथकाचे प्रमुख असलेले भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांना मात्र याबाबत माहिती नाही, हे विशेष. यापूर्वी सुमारीवाला यांनी सांगितले, ‘मला याबाबत माहिती नाही. ‘ओसीए’च्या काल, शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये यावर चर्चा झाली असावी. त्यावेळी हा निर्णय झाला असेल, असे वाटत नाही. तुम्हाला याबाबत अनिल खन्ना योग्य माहिती देतील.’ (वृत्तसंस्था)
भारताला दंड?
By admin | Updated: September 22, 2014 04:26 IST