शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पुण्याची सव्याज परतफेड! भारताची मालिकेत बरोबरी

By admin | Updated: March 7, 2017 21:10 IST

भारताने दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी मात केली. या विजयाबरोबरच भारतीय संघाने पुण्यातील पराभवाची परतफेड

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 7 - पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवाची भारताने आज सव्याज परतफेड केली. हाती अवघ्या 187 धावा असताना रविचंद्रन अश्विनने टिपलेले सहा बळी आणि त्याला उमेश यादव आणि रवींद्र जडेजाकडून मिळालेल्या सुरेख साथीच्या जोरावर भारताने बंगळुरू कसोटी ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. त्याबरोबरच चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली. सामन्यातील दोन्ही डावात अर्धशतकी खेळी करणाऱ्या लोकेश राहुलने सामनावीराचा मान पटकावला. 
 
गोलंदाजांचे नंदनवन ठरलेल्या चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर चौथ्या दिवशी भारताची भारताच्या तळाच्या फलंदाजांनी निराशा केली. पुजारा आणि रहाणेची जोडी माघारी परतल्यानंतर तळाच्या फलंदाजांनी निराशा केल्याने भारताला अवघी 187 धावांचीच आघाडी घेता आली. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींच्या चिंतेत वाढ झाली होती. भारताने दिलेल्या 188 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने आक्रमक सुरुवात केली. पण मॅट रेनेशॉला (5) बाद करत इशांत शर्माने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर वॉर्नर आणि स्मिथने वेगाने धावा फटकावत भारतावर दबाव आणला.
 
पण दुसऱ्या डावात कांगारूंचा कर्दनकाळ ठरलेल्या रविचंद्रन अश्विनने कांगारूंंना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवत भारताला विजयाच्या दिशेने नेले. अश्विनने वॉर्नरची (17) काढलेली विकेट डावाला कलाटणी देणारी ठरली. पाठोपाठ उमेश यादवने शॉन मार्श (9)  आणि स्टीव्हन स्मिथच्या (28) विकेट काढत ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले. त्यानंतर चहापानापूर्वी अश्विनने मिचेल
 
मार्श आणि मॅथ्यू वेडची विकेट काढत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले.
चहापानानंतर अश्विनने ऑस्ट्रेलियाचे शेपूट कापून काढत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 112 धावांत गुंडाळला. भारताकडून अश्विनने सहा, उमेशने दोन आणि जडेजा व इशांतने प्रत्येकी एक गडी बाद केला. तत्पूर्वी कालची नाबाद असलेली अजिंक्य रहाणे (52) आणि चेतेश्वर पुजाराची (92) जोडी तंबूत परतल्यावर भारताचा डाव कोसळला. जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्कने भारताचे शेपूट कापून काढत भारताचा दुसरा डाव 274 धावांवर संपुष्टात आणला. 
 
धावफलक

भारत पहिला डाव १८९. आॅस्ट्रेलिया पहिला डाव २७६. भारत दुसरा डाव :-लोकेश राहुल झे. स्मिथ गो. ओकीफे ५१, अभिनव मुकुंद त्रि.गो. हेजलवूड १६,चेतेश्वर पुजारा झे. मिशेल मार्श गो. हेजलवूड ९२, विराट कोहली पायचित गो.हेजलवूड १५, रवींद्र जडेजा त्रि.गो. हेजलवूड ०२, अजिंक्य रहाणे पायचितगो. हेजलवूड ५२, करुण नायर त्रि.गो. स्टार्क ००, रिद्धिमान साहा नाबाद२०, रविचंद्रन आश्विन त्रि.गो. हेजलवूड ०४, उमेश यादव झे. वॉर्नर गो.हेजलवूड ०१, ईशांत शर्मा झे. शॉन मार्श गो. ओकीफे ०६. अवांतर (१५). एकूण९७.१ षटकांत सर्वबाद २७४.

बाद क्रम : १-३९, २-८४, ३-११२, ४-१२०, ५-२३८,६-२३८, ७-२४२, ८-२४६, ९-२५८, १०-२७४.

गोलंदाजी : स्टार्क १६-१-७४-२, हेजलवूड २४-५-६७-६, लियोन ३३-४-८२-०, ओकीफे २१.१-३-३६-२, मिशेल मार्श३-०-४-०.

आॅस्ट्रेलिया दुसरा डाव :- डेव्हिड वॉर्नर पायचित गो. आश्विन १७, मॅटरेनशॉ झे. साहा गो. ईशांत ०५, स्टीव्हन स्मिथ पायचित गो. यादव २८, शॉनमार्श पायचित गो. यादव ०९, पीटर हँड््सकोंब गो. साहा गो. अश्विन २४,मिशेल मार्श झे. नायर गो. अश्विन १३, मॅथ्यू वेड झे. साहा गो. आश्विन ००,मिशेल स्टार्क त्रि.गो. आश्विन ०१, स्टीव्ह ओकीफे त्रि.गो. जडेजा ०२,नॅथन लियोन झे. व गो. आश्विन ०२, जोश हेजलवूड नाबाद ००. अवांतर (११).एकूण ३५.४ षटकांत सर्वबाद ११२.

बाद क्रम : १-२२, २-४२, ३-६७, ४-७४,५-१०१, ६-१०१, ७-१०३, ८-११०, ९-११०, १०-११२.

गोलंदाजी : ईशांत शर्मा६-१-२८-१, आश्विन १२.४-४-४१-६, यादव ९-२-३०-२, जडेजा ८-५-३-१.