शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
3
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
4
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
5
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
6
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
7
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
8
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
9
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
10
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
11
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
12
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
13
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
15
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
16
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
17
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
18
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
19
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
20
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?

पटणा पायरेट्स सुसाट

By admin | Updated: February 17, 2016 02:38 IST

पटणा पायरेट्सविरुद्ध झालेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी पूर्ण जोशात मैदानात उतरलेल्या बंगाल वॉरियर्सला चांगल्या सुरुवातीनंतरही पराभवास सामोरे जावे लागले

रोहित नाईक,  पटणापटणा पायरेट्सविरुद्ध झालेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी पूर्ण जोशात मैदानात उतरलेल्या बंगाल वॉरियर्सला चांगल्या सुरुवातीनंतरही पराभवास सामोरे जावे लागले. पिछाडीवरून बाजी मारताना पटणाने दबावाखाली आलेल्या बंगालच्या चुकांचा फायदा घेत ३२-२७ अशी बाजी मारताना प्रो-कबड्डीमध्ये सातवा विजय नोंदवला. यासह पटणाने उपांत्य फेरी निश्चित केली आहे.पाटलीपुत्र स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात बंगालने आक्रमक सुरुवात करताना आपला इरादा सष्ट केला. १०व्या मिनिटापर्यंत बंगालने नियंत्रण राखल्यानंतर पटणाने ९-७ असे पुनरागमन केले. प्रदीप नरवालने १५ व्या मिनिटाला निर्णायक सुपर रेड करताना बंगालच्या तब्बल ५ खेळाडूंना बाद करून त्यांच्यावर लोण चढवला. या जोरावर पटणाने ७ गुणांनी मोठी आघाडी घेतली. मध्यंतराला पटणाने १७-११ असे वर्चस्व मिळवले.दुसऱ्या सत्रात बंगालने जबरदस्त झुंज देत पुनरागमन केले. श्रीकांत जाधवच्या खोलवर चढाया व गिरीश एर्नाकच्या दमदार पकडी या जोरावर बंगालने ३५ व्या मिनिटावर यजमानांवर लोण चढवून २४-२५ अशी पिछाडी कमी केली. या वेळी बंगाल सामना फिरवणार, असे चित्र होते. मात्र माफक चुकांचा फटका बसल्याने अखेर त्यांना सामना गमवावा लागला. पटणाकडून रोहित कुमारने अष्टपैलू खेळ करून सर्वाधिक ८ गुण मिळवले. प्रदीपने सुपर रेडसह त्याला चांगली साथ दिली, तर हाडी ओश्तोरक व सुनील कुमार यांच्या दमदार पकडी निर्णायक ठरल्या. बंगालकडून श्रीकांतने ७ गुण घेताना एकाकी झुंज दिली, तर गिरीश एर्नाकच्या दमदार पकडी अपयशी ठरल्या. तत्पूर्वी बलाढ्य जयपूर पिंक पँथर्सने सहज बाजी मारताना तेलुगू टायटन्सला ३५-२६ असा धक्का दिला. मध्यंतराला १९-११ अशी आघाडी घेतल्यानंतर जयपूरने आणखी आक्रमक खेळ केला. जयपूरने तेलुगूवर २ लोण चढवले, तर तेलुगूने एक लोण चढवून पुनरागमनाचे प्रयत्न केले. सोनू नरवालच्या चढाया व कुलदीप सिंग, सी. अरुण यांच्या पकडी जयपूरसाठी निर्णायक ठरल्या. सुकेश हेगडे तेलुगूकडून एकाकी लढला.