शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Paris Paralympics 2024 : भारताच्या रुबिनाचा पदकी निशाणा; ब्राँझ पदकासह भारताच्या खात्यात ५ वे पदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 19:12 IST

पॅरिस पॅरालिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी भारताची पॅरा शूटर रुबिना फ्रान्सिस हिने देशासाठी आणखी एका पदकाची कमाई केली

पॅरिस पॅरालिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी भारताची पॅरा शूटर रुबिना फ्रान्सिस हिने देशासाठी आणखी एका पदकाची कमाई केली. महिला गटातील १० मीटर एअर पिस्टल SH 1 प्रकारात तिने कांस्य पदकाची कमाई केली. अंतिम फेरीत २११.१ गुणांसह ती तिसऱ्या क्रमांकावर राहिली.  रुबिना हिने पात्रता फेरीत  ९०, ९०,९५, ९२, ९५९४ असे एकूण ५५६-१३x गुणांसह सहाव्या क्रमांकावर राहत अंतिम फेरी गाठली होती.

नेमबाजीतून चौथे अन् भारताच्या खात्यातील पाचवे पद 

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजांनीच भारताच्या पदकाचे खाते उघडले होते. अवनी लेखरा आणि मोना अग्रवाल यांनी १० मीटर अयर रायफल (एसएच1) प्रकारात भारताला अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्य पदकाची कमाई करून दिली होती. या दोघींना मिळालेल्या यशानंतर मनीष नरवाल यानेही रौप्य पदकासाठी निशाणा मारला. त्याने १० मीटर एअर पिस्तूल एसएच १ प्रकारात पदकी निशाणा साधला होता. त्यानंतर आता तिसऱ्या दिवशी रुबिना फ्रान्सिस हिने आणखी एका पदकाची कमाई केली आहे. भारताच्या खात्यातील हे पाचवे पदक आहे. याशिवाय नेमबाजी क्रीडा प्रकारातील भारताचे हे चौथे पदक आहे. नेमबाजांशीवाय प्रीती पाल हिने मैदानी खेळात कांस्य पदकाची कमाई केली आहे.

शारीरिक समस्येवर मात करून गाजवली जगातील मानाची स्पर्धा

१९९९ मध्ये मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे जन्मलेली रुबिना ४० टक्के दिव्यांग आहे. मोठ्या संघर्षातून तिने भारताच्या पॅरा शूटरच्या रुपात आपली ओळख निर्माण केली. रुबिना ही रिकेट्स या आजाराने ग्रस्त आहे. यामुळे हाडांच्या वाढीवर प्रभाव पडतो. पण शारीरिक समस्येवर मात करत तिने आपली ताकद ओळखून नेमबाजीत हात आजमावला. आता जगाच्या मानाच्या स्पर्धेत तिने देशाची मान उंचावत आपल्यातील क्षमता दाखवून दिली आहे. 

 

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धा