शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पॅरिस ऑलिम्पिक : अमेरिका, चीन यांचेच राहणार वर्चस्व; अधिकाधिक पदके जिंकण्याची शक्यता  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 07:30 IST

अमेरिका ३९ सुवर्णपदकांसह एकूण १२३ पदके जिंकण्याचा अंदाज आहे.

पॅरिस : पुढील १०० दिवसांत सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक आणि एकूण पदक संख्येच्या बाबतीत अमेरिका, चीन हे दोन देश पहिल्या दोन क्रमांकांवर राहण्याची शक्यता आहे. अमेरिका ३९ सुवर्णपदकांसह एकूण १२३ पदके जिंकण्याचा अंदाज आहे. चीन ३५ सुवर्णपदकांसह ८९ पदके जिंकण्याची शक्यता आहे. तीन वर्षांपूर्वी कोरोना महामारीमुळे विलंब झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही हे दोन देश पदकांच्या बाबतीत पहिल्या दोन क्रमांकांवर होते.     जगभरातील क्रीडा लीगसाठी सांख्यिकीय विश्लेषण करणाऱ्या निल्सनच्या ग्रेसनोट स्पोर्ट्सने हा अंदाज वर्तविला आहे. खेळांबरोबरच ऑलिम्पिक खेळांशी संबंधित प्रमुख कार्यक्रमांवरही ते लक्ष ठेवतात. ग्रेसनोटची क्रमवारी जिंकलेल्या एकूण पदकांवर आधारित असते, तर इतर क्रमवारी एकूण सुवर्णपदकांवर आधारित असते. 

उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेने एकूण सर्वाधिक पदके जिंकण्याचा अंदाज वर्तविला जाण्याची ही सलग आठवी वेळ आहे. बार्सिलोनामध्ये १९९२ मध्ये युनिफाइड संघ पदक संख्येच्या बाबतीत अव्वल स्थानी होता. ते खेळाडू पूर्वीच्या सोव्हिएत युनियनचे होते. ते नंतर एक सार्वभौम राज्य म्हणून वेगळे झाले. अमेरिका ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकांच्या बाबतीत २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अव्वल स्थानी नव्हता. तेव्हा चीनने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती आणि त्याचे फायदेही दिसत होते. 

‘आतापासून प्रत्येक सराव सत्र महत्त्वाचे’‘पॅरिस ऑलिम्पिकसाठी केवळ १०० दिवस राहिले आहेत. अशावेळी आमच्यासाठी प्रत्येक दिवस, प्रत्येक सराव शिबिर, सत्र महत्त्वाचे आहे,’ असे भारतीय पुरुष हाॅकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याने म्हटले. टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता भारतीय संघ जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी आहे. हरमनप्रीत म्हणाला की, ‘ऑस्ट्रेलियाच्या कठीण दौऱ्यावरून आम्ही परतलो आहोत. ऑलिम्पिकसाठी १०० दिवस राहिल्याने संघाचा उत्साह वाढला आहे. सुवर्ण लक्ष्य ठेवूनच आम्ही खेळू.’

टॅग्स :Parisपॅरिस