शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्ताननं फक्त एक पदक जिंकलं अन् भारताला मागं टाकलं; पदकतालिकेत मोठी झेप घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 12:48 IST

paris olympics 2024 updates in marathi : भारताने ऑलिम्पिक २०२४ मध्ये आतापर्यंत पाच पदके जिंकली आहेत.

paris olympics 2024 medal tally : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ची स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. गुरुवारी रात्री भारत आणि पाकिस्तान या दोन्हीही देशातील तमाम नागरिकांच्या नजरा आपल्या भालाफेकपटूंकडे लागल्या होत्या. भारताचा नीरज चोप्रा तर पाकिस्तानचा अर्शद नदीम मैदानात होता. मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रासमोर पदकाचा बचाव करण्याचे मोठे आव्हान होते. पण, पाकिस्तानच्या अर्शदने ऐतिहासिक कामगिरी करताना तब्बल ९२.९७ मीटर भाला फेकला. त्याने यासह ऑलिम्पिकमध्ये सर्वात दूर भाला फेकण्याचा विश्वविक्रम केला. भारताचा स्टार नीरज चोप्रा पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरला होता. पण दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८९.४५ मीटर भाला फेकत हंगामातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.

अर्शद नदीमने सर्वात दूर भाला फेकून आपल्या देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले. शेजाऱ्यांना तब्बल ३२ वर्षांनंतर ऑलिम्पिकमधून पदक मिळाले. विशेष बाब म्हणजे पाकिस्तानने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये केवळ एक पदक जिंकले असले तरी ते पदकतालिकेत भारताच्या पुढे आहेत. भारताने चार कांस्य आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. मात्र, भारत एकही सुवर्ण पदक जिंकू न शकल्याने पदकतालिकेत आताच्या घडीला ६४व्या स्थानी आहे, तर पाकिस्तान एका सुवर्ण पदकासह ५३व्या क्रमांकावर पोहोचला. 

अमेरिकेचा दबदबा 

दरम्यान, अमेरिकेने आतापर्यंत सर्वाधिक पदके जिंकली आहेत. त्यांनी ३० सुवर्ण, ३८ रौप्य आणि ३५ कांस्य पदकांसह एकूण १०३ पदकांना गवसणी घातली. तर ७३ पदकांसह चीन दुसऱ्या आणि ४५ पदकांसह ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे. 

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने आतापर्यंत चार कांस्य आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. गुरुवारी भारताच्या खात्यात आणखी दोन पदकांची नोंद झाली. भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Neeraj Chopraनीरज चोप्राPakistanपाकिस्तान