शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

Paris Olympics 2024 : भारताच्या श्रीजानं कमाल केली; वाढदिवशी देशवासियांना गिफ्ट दिलं, लवलीनाचाही दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 16:23 IST

Paris Olympics 2024 updates : श्रीजा अकुलाने तमाम देशवासियांना खुशखबर देताना राऊंड-१६ मध्ये प्रवेश केला.

Paris Olympic 2024 Updates In Marathi : पहिल्यांदाच ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत खेळत असलेल्या भारताच्या श्रीजा अकुलाने तमाम देशवासियांना खुशखबर देताना राऊंड-१६ मध्ये प्रवेश केला. टेबल टेनिसमध्ये २६ वर्षीय खेळाडूने चमकदार कामगिरी केली. तिने राऊंड-३२ मध्ये ४-२ असा विजय साकारला. श्रीजाने या विजयासह इतिहास रचला. ऑलिम्पिकच्या इतिहासात प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारी ती दुसरी भारतीय महिला शिलेदार ठरली आहे.

भारतीय शिलेदारांची आजची कामगिरी पीव्ही सिंधूचा सलग दुसरा विजयलक्ष्य सेनचा 'करा किंवा मरा'च्या सामन्यात विजयवाढदिवशी श्रीजा अकुलाने देशवासियांना दिली विजयाची भेट महाराष्ट्राचा सुपुत्र स्वप्नील कुसाळेचा अंतिम फेरीत प्रवेशलवलीना बोरगोहेनचा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश 

श्रीजाची अप्रतिम कामगिरी

आज बुधवारचा दिवस भारतासाठी खूप खास राहिला. पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, श्रीजा अकुला, स्वप्नील कुसाळे आणि लवलीना बोरगोहेन यांनी विजय संपादन केला. महाराष्ट्राचा सुपुत्र असलेल्या स्वप्नीलने अंतिम फेरी गाठली आहे. तो ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. कोल्हापुरचा सुपुत्र असलेल्या स्वप्नीलने ५९० गुणांसह सातवे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. भारताची आणखी एक शिलेदार ऐश्वर्य प्रताप सिंग ११व्या क्रमांकावर राहिला अन् तो अंतिम फेरीला मुकला. खरे तर अव्वल आठ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. ऐश्वर्य प्रतापला पहिल्या आठमध्ये स्थान मिळवता न आल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे कोल्हापुरचा पठ्ठ्या भारताला पदक मिळवून देणार का हे पाहण्याजोगे असेल. 

दरम्यान, भारताची स्टार महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिने शानदार विजय नोंदवला. लवलीनाने हा सामना ५-० असा जिंकला. यासह तिने आता उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. लवलीना आता पदक निश्चित करण्यापासून केवळ एक विजय दूर आहे.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४IndiaभारतTable Tennisटेबल टेनिसboxingबॉक्सिंग