शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Paris Olympic 2024 : प्रेमाच्या शहरात प्रेम व्यक्त करताना...! बॅडमिंटनपटूला सुवर्णपदकासह एंगेजमेंट रिंग मिळाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 17:00 IST

पॅरिसला प्रेमाचे शहर म्हणून ओळखले जाते.

पॅरिसला प्रेमाचे शहर म्हणून ओळखले जाते. जगभरातील जोडपी येथे आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी येतात. इथेच ऑलिम्पिक २०२४ चा थरार रंगला आहे. ऑलिम्पिकमध्ये पदकांसाठी खेळाडूंमध्ये चढाओढ सुरूच आहे. अशातच शुक्रवारी बॅडमिंटन कोर्टवर एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यानंतर लियू युचेनने त्याची सुवर्ण पदक विजेती प्रेयसी हुआंग याकिओंगला लग्नासाठी प्रपोज केले. चीनची बॅडमिंटन स्टार हुआंग याकिओंगने पॅरिस ऑलिम्पिकमधून सुवर्ण पदकासह एंगेजमेंट रिंगही मिळवली.

३० वर्षीय याकिओंगने झेंग सी वेईसोबत खेळत मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक जिंकले. हे तिचे ऑलिम्पिकमधील पहिलेच सुवर्ण पदक आहे. मिश्र दुहेरीचा पदक सोहळा आटोपल्यानंतर चीनकडून पुरुष दुहेरीत खेळणाऱ्या लियू युचेनने याकिओंगसमोर गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केले. यावेळी त्याने खिशातून अंगठी काढली आणि हुआंगला प्रपोज केले. यानंतर तिथे उपस्थित प्रेक्षकांनी आनंदाने उड्या मारल्या आणि टाळ्या वाजवून दोघांचेही अभिनंदन केले. 

खरे तर जेव्हा लियू युचेनने गुडघे टेकून लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा हुआंग भावुक झाली. यानंतर हुआंगने होकार देत त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. हुआंग याकिओंग म्हणाली की, तिला पॅरिसमध्ये एंगेजमेंट रिंग मिळण्याची अपेक्षा नव्हती. मी केवळ खेळाच्या तयारीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. मी माझ्या भावना शब्दांत मांडू शकत नाही. मी खूप आनंदी आहे, असे ती सांगते. 

पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्याच फेरीत लियू युचेन स्पर्धेबाहेर झाला होता. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. हुआंग याकिओंगलाही टोकियोमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. पण, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लियू आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही पण हुआंगने रौप्यवरून सुवर्ण पदकापर्यंत मजल मारली. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टSocial Viralसोशल व्हायरलchinaचीन