शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Neeraj Chopra : गो फॉर गोल्ड! नीरज चोप्राकडे महा पराक्रमाची 'सुवर्ण' संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 13:37 IST

तो यशस्वी ठरला तर सलग दोन वेळा सुवर्ण पदकाची कमाई करणारा तो पहिला भारतीय ठरेल. 

अभिजीत देशमुख, पॅरिसहून

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात आतापर्यंत 3 पदकं जमा झाली आहेत. पहिल्या आठवड्यात वेगवेगळ्या खेळ प्रकारात भारतीय खेळाडूंच्या पदरी निराशीही पडली. त्यात विनेश फोगाटच्या अपात्रतेमुळे भारताला एक मोठा धक्काही बसला आहे.  

एका बाजूला विनेश फोगाटचा मुद्दा चर्चेत असताना दुसऱ्या बाजूला भारतीयांच्या नजरा गोल्डन बॉय नीरज चोप्रावर खिळल्या आहेत. 8 ऑगस्ट रोजी 'लव्ह ऑफ सिटी' पॅरिसमध्ये नीरज चोप्रा देशवासियांना पुन्हा एकदा  सुवर्ण क्षणांची अनुभूती देईल, अशी अपेक्षा आहे. 

नीरज चोप्रा कमालीच्या सातत्यासह दृढ निश्चयासह ध्येय साध्य करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. त्याने वेगवेगळ्या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीसह आपल्यातील कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. आता पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भालाफेक क्रीडा प्रकारातील अंतिम फेरीत त्याच्याकडून दमदार आणि अभिमानास्पद अशा कामगिरीची अपेक्षा आहे.   

महिला कुस्तीपटू विनेश फोगाट अधिक वजन असल्यामुळे अपात्र ठरली.  या घटनेमुळं भारताच्या अपेक्षांना जणू एकप्रकारचा सुरुंगच लागला.  त्यामुळेच आता नीरज चोप्राची कामगिरी ही फक्त वैयक्तिक नसून भारतीय ताफ्यात एक संजीवनी देणारी ठरेल.   

ज्या मैदानी खेळात (अ‍ॅथलेटिक्स) परदेशी खेळाडूंचा बोलबाला आहे, तिथं नीरज चोप्रा भारताची एक वेगळी ओळख निर्माण करताना दिसतोय. पॅरिस ऑलिम्पिकमधील त्याची कामगिरी या क्रीडा प्रकारातील भारताचे भवितव्य अधिक उज्वल करण्यासाठी  प्रेरणादायी ठरेल. तरुण खेळाडूंना ध्येय सेट करण्यासाठी तो आणखी उदाहरण सेट करेल.  या वेगवेगळ्या पैलूंमुळे नीरज चोप्राचा इवेंट अधिक खास आणि आकर्षक ठरतो. 

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा ही नीरज चोप्रासाठी फक्त स्पर्धा नाही. पुन्हा एकदा नवा  इतिहास रचण्याची ही एक सुवर्ण संधी आहे.  टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात तो यशस्वी ठरला तर सलग दोन वेळा सुवर्ण पदकाची कमाई करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरेल. या ऐतिहासिक कामगिरीसह एक नवा विक्रम  प्रस्थापित करण्याची संधी त्याच्याकडे आहे.

भारतीयांना देखील नीरज चोप्राकडून अशाच अभिमानास्पद कामगिरीची अपेक्षा आहे. जर त्याने अपेक्षेला साजेसा खेळ केला तर मैदानी क्रीडा प्रकारात भारत एका विशेष उंचीवर पोहचेल, ही गोष्ट नव्या पिढ्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरित करेल. 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४