शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

Paris olympic 2024: धावपटूला प्रियकराने पेट्रोल शिंपडून जिवंत जाळले, उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 22:07 IST

याप्रकरणी आरोपीला कडक शिक्षेची मागणी करण्यात येत आहे.

Paris olympic 2024 : काही दिवसांपूर्वीच पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत युगांडाची धावपटू रेबेका चेप्टेगी हिनेही(Rebecca Cheptegei) सहभाग नोंदवल होता. पण, आता रेबेकाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेबेकाच्या माजी प्रियकराने तिच्यावर पेट्रोल शिंपडून तिला पेटवून दिले होते, ज्यात ती 75 टक्के भाजली होती. रेबेकाला गंभीर अवस्थेत केनियातील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे उपचारादरम्यान आज(दि.5) तिचा मृत्यू झाला.

2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रेबेका चेप्टेगीला 44 व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. दरम्यान, रेबेकाच्या हत्येमुळे युगांडामध्ये शोककळा पसरली असून, तिच्या माजी प्रियकरावर कडक कारवाई करण्याची मागणी लोक करत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रेबेकाचे कुटुंब आणि चाहते तिच्या मृत्यूमुळे खूप दु:खी असून तिला न्याय मिळण्याची मागणी करत आहेत.

काय म्हणाले ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष?या घटनेवर युगांडाच्या ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष डोनाल्ड रुकारे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटेल की, आम्हाला दुःखद बातमी मिळाली की, आमची ऑलिम्पिक ऍथलीट रेबेका चेप्टेगी आता या जगात नाही. तिच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आम्ही प्रार्थना करतो.

दोघांमध्ये वाद सुरू होतामिळालेल्या माहितीनुसार, रेबेका आणि तिचा माजी प्रियकर यांच्यात जमिनीवरुन वाद सुरू असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, अद्याप कुठलीही ठोस माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, रेबेका गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 14व्या स्थानावर होती. तर, 2022 मध्ये तिने थायलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड माउंटन आणि ट्रेल रनिंग चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले होते.

 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Internationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारी