शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पॅरिस ऑलिम्पिक पदकाचा ‘रंग’ उडाला; निकृष्ट दर्जाचे पदक मिळाल्याचा खेळाडूंनी केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 07:01 IST

रंग निघून गेलेल्या आपल्या कांस्यपदकाचा फोटोही केला पोस्ट

पॅरिस: ऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडूचे असते. यासाठी खेळाडू जीवापाड मेहनत घेतो. परंतु, हे ऑलिम्पिक पदक खराब निघाले, तर काय? अगदी अशीच अवस्था पॅरिस ऑलिम्पिकमधील काही पदक विजेत्यांची झाली आहे. ब्रिटनची कांस्यपदक विजेती यास्मिन हार्परने हा दावा केला आहे की, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या पदकाचा रंग उडालाय. यास्मिनने सोशल मीडियावर या रंग निघून गेलेल्या आपल्या कांस्यपदकाचा फोटोही पोस्ट केला आहे. यास्मिनने १०० मीटर सिंक्रोनाइस स्प्रिंगबोर्ड स्पर्धेत कांस्य कमाई केली होती.

हे ऑलिम्पिक पदक नवे करकरीत असतानाच चांगले वाटते; पण थोड्या वेळाने आपल्या त्वचेवरील घाम या पदकावर लागल्यानंतर आणि मित्रांकडे काहीवेळ दिल्यानंतर या पदकाचा दर्जा समोर दिसून येतो. हे पदक मिळून केवळ एक आठवडाच झाला आहे. या पदकाची समोरील बाजू काहीशी उखडू लागली आहे. कशामुळे ते माहीत नाही. बहुतेक याचा दर्जा वाढवायला हवा.- नायजा हस्टन, अमेरिकन कांस्य विजेता, स्ट्रीट स्केटबोर्ड

पदकाचा रंग उडाल्याच्या घटनांवर अद्याप पॅरिस ऑलिम्पिक आयोजकांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

यांचीही तक्रार...

अमेरिकेच्या स्केटबोर्ड संघातील खेळाडूंनीही याबाबत तक्रार केली आहे. कांस्यपदकाचा केवळ रंगच उडाला नसून मागच्या बाजूने हे पदक तुटल्याचेही अमेरिकन खेळाडूंनी सांगितले. ‘हे काहीसे निराशाजनक आहे. केवळ एक आठवडा हे पदक चमकत होतं,’ असे यास्मिनने म्हटले.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४