शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

Paralympics 2020 : गोल्डन बॉय सुमित अंतिल याच्यासाठी आनंद महिंद्रांचं खास गिफ्ट; XUV 7OOची नवी Javelin edition!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 10:55 IST

Paralympics 2020 : टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत सोमवारचा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला. नेमबाज अवनी लेखरा व भालाफेकपटू सुमित अंतिल यांनी सुवर्णपदक पटकावले

Paralympics 2020 : टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत सोमवारचा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला. नेमबाज अवनी लेखरा व भालाफेकपटू सुमित अंतिल यांनी सुवर्णपदक पटकावले, तर  देवेंद्र झझारियाने भालाफेकीत तसेच योगेश कथुनिया याने थाळीफेकीत रौप्य पदक जिंकले. सुंदरसिंग गुर्जर कांस्यचा मानकरी ठरला. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी नेमबाद अवनी हिच्यानंतर गोल्डन बॉय सुमित अंतिल याच्यासाठी खास गिफ्ट तयार करण्यास सांगितले आहे. सुमितला आनंद महिंद्रा यांनी  Javelin edition of XUV 700 गिफ्ट करण्याची घोषणा केलीय.  

Afghanistan Crisis: शाहिद आफ्रिदीचा धक्कादायक दावा; तालिबानी सकारात्मक दृष्टीकोन घेऊन आलेत! Video

सोमवारी सुमित अंतिलनं पहिल्याच प्रयत्नांत ६६.९५ मीटर लांब भालाफेक करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. दुसऱ्या प्रयत्नात त्यानं आणखी लांब भाला फेकताना ६८.८ मीटर सह नवा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला.  ( Sumit Antil throws another World Record of 68.08m in his second attempt in the Men's Javelin Throw F64 Final event). तिसऱ्या प्रयत्नात सुमितनं ६५.२७ मीटर भालाफेक केली, परंतु अन्य स्पर्धकांच्या तुलनेत त्यानं याही फेरीत चांगली कामगिरी करून दाखवली. त्यानं पाचव्या प्रयत्नात पुन्हा ६८.५५ मीटर लांब भालाफेकून पुन्हा स्वतःचाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. या कामगिरीसह त्यानं सुवर्णपदकही नावावर केलं.

आनंद महिंद्रांनी गोल्डन बॉयचे कौतुक केले. त्यांनी लिहिलं की,''अविश्वसनीय कामगिरी. त्याची ही कामगिरी XUV 700 ची हकदार आहे. भारताने ऐतिहासिक क्रीडा प्रकारात आज दोन सुवर्णपदक जिंकले.'' महिंद्रा यांनी त्यांच्या टीममधील सदस्याला सुमितसाठी Jevelin Edition XUV 700 तयार करण्यास सांगितले.     

सोनेरी यश मिळवणाऱ्या अवनीवर बक्षिसांचा वर्षाव, आनंद महिंद्रा देणार खास गिफ्ट 

अवनी लेखरा हिने महिलांच्या दहा मीटर एअर रायफलच्या क्लास एसएच नेमबाजीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. (Tokyo Paralympics)अंतिम फेरीत तिने २४९.६ गुण मिळवत  तिने जागतिक विक्रमाची बरोबरी करत अव्वलस्थान पटकावले. (Avani Lekhara) पात्रता फेरीत सातव्या स्थानावर राहिलेल्या अवनीने अंतिम फेरीत मात्र जोरदार कामगिरी केली आणि सुवर्णवेध घेतला. या स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले. आनंद महिंद्रा यांनीही अवनीच्या या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून अवनीला स्पेशल गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. 

आनंद महिंद्रा आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, आम्ही दिव्यांगांसाठी एसयूव्ही विकसित करावी, असा सल्ला काही दिवसांपूर्वी दीपा मलिक हिने दिला होता. मी माझे सहकारी वेलू यांना या आव्हानाचा सामना करण्यासाठी विनंती केली आहे. वेलू हे आमचे डेव्हलपमेंट हेड आहेत. असो वेलूजी तुमच्याकडून विकसित झालेली अशी पहिली एसयूव्ही #AvaniLekhara हिला समर्पित करून भेट देऊ इच्छितो.  

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाAnand Mahindraआनंद महिंद्रा