शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
3
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
4
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
5
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
6
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
7
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
8
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
9
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
11
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
12
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
13
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
14
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
15
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
16
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी

Tokyo Olympic : पाकिस्तानात ऑलिम्पिकपटू घडवण्यासाठी क्रिकेटपटू निधी गोळा करणार, खेळाडूंची अवस्था पाहून व्यथित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 23:05 IST

Tokyo Olympic स्पर्धेत भारताचे 119 खेळाडू सहभागी झाले आहेत, तेच दुसरीकडे पाकिस्तानचे फक्त 10 खेळाडू या मेगा क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

Tokyo Olympic स्पर्धेत भारताचे 119 खेळाडू सहभागी झाले आहेत, तेच दुसरीकडे पाकिस्तानचे फक्त 10 खेळाडू या मेगा क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा क्रिकेटपटू इमरान नझीरनं तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यात आता शादाब खाननं पुढील ऑलिम्पिकच्या तयारीसाठी आतापासून निधी गोळा करण्याचा संकल्प केला आहे. त्यानं सोशल मीडियावर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंना सोयी सुविधा मिळाव्या यासाठी निधी गोळा करण्याचा निर्धार सोशल मीडियावर व्यक्त केला. त्यानं यावेळी पाकिस्तानातील जनतेलाही पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. ( pakistani cricketer Shadab Khan pledge to set up a fund for Pakistan’s Olympic’s athletes in preparation for the next Olympics) २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानच्या २१ खेळाडूंचा सहभाग होता. १९५६ मध्ये संपन्न झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ६२ खेळाडू सहभागी झाले होते. पाकिस्तानला आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये १० पदकं मिळाली आहेत. यामध्ये ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. १९९२ नंतर पाकिस्तानला ऑलिम्पिकमध्ये एकही पदक मिळालेलं नाही.  त्यानं यावेळी वेटलिफ्टर तल्हा तालीब याचे कौतुक केलं. अशा खेळाडूंना योग्य स्पॉन्सर मिळायला हवेत असेही त्यानं आवाहन केलं.  शादाबने 6 कसोटींत 300 धावा आणि 14 विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय 48 वन डेत 434 धावा व 62 विकेट्स आणि 49 ट्वेंटी-20त 221 धावा व 58 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Pakistanपाकिस्तान