शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पाकने मालिका जिंकली

By admin | Updated: July 8, 2015 03:57 IST

युनिस खानने झळकवलेल्या शानदार नाबाद १७१ धावांच्या बळावर पाकिस्तानने श्रीलंकेवर ७ गडी राखून मात करीत तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने जिंकली.

पाकने मालिका जिंकली कसोटी : युनिस खानच्या नाबाद १७१ धावांच्या खेळीने विजय साकार पाल्लेकल : युनिस खानने झळकवलेल्या शानदार नाबाद १७१ धावांच्या बळावर पाकिस्तानने श्रीलंकेवर ७ गडी राखून मात करीत तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने जिंकली. श्रीलंकेकडे पहिल्या डावात ६३ धावांची आघाडी होती. दुसर्‍या डावात श्रीलंकेने ३१३ धावा केल्या. पाकिस्तानसमोर विजयासाठी ३७६ धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अडखळत झाली. सलामीचा फलंदाज अहमद शेहझाद (०) दुसर्‍याच षटकात तंबूत परतला. पाठोपाठ अझहर अली (५) झटपट बाद झाल्याने पाकची अवस्था २ बाद १३ अशी बिकट झाली. त्यानंतर मात्र सलामवीर शान मसूद (१२५) व युनिस खानने (नाबाद १७१) फलंदाजीची सूत्रे हाती घेत श्रीलंकेच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार केला. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी २४२ धावांची भक्कम भागीदारी करीत संघाला विजयाच्या समीप नेले. संघाचा धावफलक २५५ वर असताना कौशलच्या गोलंदाजीवर यष्टिचीत झाला. त्यानंतर मिसबाह उल हकने ५९ धावांची दमदार खेळी करीत युनिसला मोलाची साथ देत ३८२ धावा करीत विजयी लक्ष्य पूर्ण केले. प्रसाद, लकमल व कौशल यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. संक्षिप्त धावफलक : श्रीलंका पहिला डाव : ८९.५ षटकांत सर्व बाद २७८ धावा, करुणारत्ने १३० यष्टिचीत सर्फराज अहमद हो. अझर अली, थरंगा ४६ झे. युनिस खान गो. यासिर शाह, जे. मुबारक २५ यष्टिचीत गो. यासीर शाह, चंदीमल २४ पायचीत गो. राहत अली, पाकिस्तान पहिला डाव : ६६ षटकांत सर्व बाद २१५, अहमद शेहझाद २१ झे. चंदीमल गो. प्रदीप, अझहर अली ५२ झे. करुणारत्ने गो. प्रदीप, सर्फराज अहमद नाबाद ७८, यासिर शाह १८ झे. चंदीमल गो. प्रसाद, श्रीलंका दुसरा डाव : ९५.४ षटकांत सर्व बाद ३१३, थरंगा ४८ झे. अझहर अली गो. यासिर शाह, मॅथ्यूज १२२ झे. सर्फराज अहमद गो. इम्रान खान, जे. मुबारक ३५ झे. असगर अली गो. यासिर शाह, चंदीमल ६७ पायचीत गो. इम्रान खान, पाकिस्तान दुसरा डाव : १०३.१ षटकांत ३ बाद ३८२, शान मसूद १२५ यष्टिचीत गो. कौशल, युनिस खान नाबाद १७१, मिस्बाह उल हक नाबाद ५९पाकिस्तान कसोटी क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर श्रीलंकेविरुद्ध मिळविलेल्या विजयामुळे पाकिस्तानने कसोटी क्रमवारीत भारत व न्यूझीलंडला मागे टाकत तिसर्‍या स्थानावर झेप घेतली आहे. न्यूझीलंड चौथ्या तर भारत पाचव्या स्थानावर आहे. पराजयामुळे श्रीलंकेला ५ गुणांचा फटका बसला असला तरी ते सातव्या स्थानावर कायम आहेत. पहिल्या दोन क्रमांकावर अनुक्रमे ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका हे संघ आहेत. ------------