शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आगामी विश्वचषक स्पर्धेला पाकिस्तान मुकणार?

By admin | Updated: January 29, 2017 08:52 IST

2019 साली होणा-या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान खेळू शकेल की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहेत. त्यामागे कारण आहे...

ऑनलाइन लोकमत

दुबई, दि. 29 - 2019 साली होणा-या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान खेळू शकेल की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहेत. त्यामागे कारण आहे पाकिस्तान संघाची  सातत्याने होत असलेली गचाळ कामगिरी.  नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसीच्या क्रमवारीमध्ये पाकिस्तानची आठव्या स्थानी घसरण झाली आहे. 

पाकिस्तान संघाचे सध्या 89 गुण असून ते दोन अंकांनी बांगलादेशच्या मागे आहेत तर तर दोन अंकांनी वेस्ट इंडिजच्या पुढे आहे.   पाकिस्तान संघाच्या क्रमवारीत फारसा बदल झालेला नाही, तसेच विश्वचषकात खेळण्यासाठी आवश्यक गुणांपेक्षा पाकिस्तानच्या गुणांची संख्या फारच कमी आहे, असे आयसीसीने म्हटलं आहे. 
 
30 सप्टेंबर 2017 पर्यंत आयसीसीच्या वन डे क्रमवारीतील टॉप 7 संघ विश्वचषकासाठी थेट पात्र ठरतील.  आयसीसीच्या क्रमवारीत 112 गुण मिळवून  टीम इंडिया तिस-या स्थानी आहे तर 116 गुणांसह दक्षिण आफ्रिका दुस-या  आणि 120 गुणांसह पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे. 
 
फेब्रुवारी महिन्यात यूएईमध्ये पाकिस्तानला  बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी, तीन वन डे आणि एक टी-ट्वेंटी सामन्याची मालिका खेळायची आहे. नंतर  मार्च-एप्रिलमध्ये पाकिस्तान वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. तिथे पाकिस्तानला वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी, तीन वन डे आणि दोन टी-ट्वेंटी सामने खेळायचे आहेत. त्यानंतर पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना करायचा आहे.