शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

पाकिस्तान "चॅम्पियन्स", भारताचा "विराट" पराभव; फलंदाजांच्या नांग्या

By admin | Updated: June 18, 2017 22:00 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महामुकाबल्यामध्ये भारतीय संघाला 180 धावांनी दारूण पराभवाचा सामना करावा लागला.

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 18 - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महामुकाबल्यामध्ये भारतीय संघाला 180 धावांनी दारूण पराभवाचा सामना करावा लागला. 339 धावांचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. अवघ्या 158 धावांमध्ये भारताच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. या सामन्यात भारताच्या फलंदाजांसोबत विराटच्या कॅप्टनशीपबद्दलही अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. 
 
पाकिस्तानच्या फलंदाजांकडून सपाटून मार खात असतानाही आर.अश्विनला सातत्याने गोलंदाजी देण्याच्या निर्णयावर जोरदार टीका होत आहे. बांगलादेशविरूद्धच्या विजयात मोक्याच्या क्षणी दोन विकेट घेऊन सामन्याला  कलाटणी देणा-या केदार जाधवला जवळपास 40 व्या षटकात विराटने गोलंदाजी दिली. डेथ ओव्हर्समध्ये पार्ट टाइम बॉलरला गोलंदाजी देणं योग्य नव्हतं अशी टीकाही विराटवर सोशल मीडियावर होत आहे. 
 
339 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात अत्यंत खराब झाली. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने आपल्या घातक गोलंदाजीच्या बळावर भारतीय फलंदाजीचं अक्षरशः कंबरडं मोडलं. त्याने पहिल्याच षटकात भारताचा सलामीवीर रोहित शर्माला भोपळाही न फोडता बाद केलं. त्यानंतर मैदानात आलेल्या भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही आज निराश केलं. वैयक्तिक दुस-या षटकात मोहम्मद आमिरने त्याला केवळ 5 धावांवर शादाब खानकरवी झेलबाद केलं. तर त्यानंतर शानदार फॉर्ममध्ये असलेल्या शिखर धवनलाही त्याने 21 धावांवर यष्टीरक्षक कर्णधार सरफराज अहमदकडे झेल देण्यास भाग पाडलं. भरवशाच्या युवराज आणि धोनीनेही आज सपशेल निराशा केली. अनुक्रमे 22 आणि 4 धावा काढून दोघं बाद झाले. त्यानंतर मिडल ऑर्डरमधला केदार जाधवही 9 धावांवर तंबूत परतला.  हार्दिक पांड्याने 76  धावांची जिगरबाज खेळी केली मात्र, त्याला साथ मिळाली नाही. हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा यांच्यातील ताळमेळ चुकला आणि पांड्या धावबाद झाला. तळाचे फलंदाज जाडेजा(15), अश्विन(1), बुमरा (1), भुवनेश्वर (1*) फारशी चमक दाखवू शकले नाहीत. 
 
त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करुन तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची स्वप्न पाहणाऱ्या टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.