शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

पाकचा सलग दुसरा विजय

By admin | Updated: March 4, 2015 23:49 IST

पाकिस्तानने विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या ‘ब’ गटात बुधवारी खेळल्या गेलेल्या लढतीत संयुक्त अरब अमिरात (युएई) संघाचा १२९ धावांनी पराभव करीत सलग दुसरा विजय मिळविला

यूएईवर १२९ धावांनी मात : अन्वरची एकाकी लढत व्यर्थनेपियर : पाकिस्तानने विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या ‘ब’ गटात बुधवारी खेळल्या गेलेल्या लढतीत संयुक्त अरब अमिरात (युएई) संघाचा १२९ धावांनी पराभव करीत सलग दुसरा विजय मिळविला आणि बाद फेरी गाठण्याच्या आशा कायम राखल्या. सलामीवीर फलंदाज अहमद शहजादला (९३) वैयक्तिक शतक साकारता आले नाही, पण त्याच्या आक्रमक खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ६ बाद ३३९ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना युएई संघाचा डाव ८ बाद २१० धावांत रोखला गेला. युएई संघातर्फे शायमन अन्वरने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. खुर्रम खान (४३) व अमजद जावेद (४०) यांनी उल्लेखनीय योगदान दिल्यामुळे युएई संघाला २०० धावांचा पल्ला ओलांडता आला. पाकिस्तानतर्फे सोहेल खान व वहाब रियाज यांनी प्रत्येकी ५४ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी २ बळी घेतले. अष्टपैलू शाहीद आफ्रिदीने ३५ धावांत दोन फलंदाजांना माघारी परतवले. या विजयामुळे पाकिस्तानने गुणतालिकेत सहाव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर उडी घेतली. पाकिस्तानच्या फलंदाजांनी बलाढ्य संघाविरुद्ध ही धावसंख्या उभारली नसली, तरी बाद फेरी गाठण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानच्या फलंदाजांना यामुळे सूर गवसण्यास मदत मिळेल, अशी आशा आहे. नाणेफेक गमाविल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर नासीर जमशेद (४) झटपट माघारी परतला. त्यानंतर शहजाद व हॅरिस सोहेल (७०) यांनी दुसऱ्या विकेटसाठी १७० धावांची भागीदारी करीत मोठ्या धावसंख्येची मजबूत पायाभरणी केली. मोहंमद नवीदने सोहेलला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. शहजाद चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. त्याने १०५ चेंडूंना सामोरे जाताना ९३ धावांची खेळी केली. त्यात ९ चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. शोएब मकसूद (३१ चेंडू, ४५ धावा, ४ चौकार, २ षटकार) आणि कर्णधार मिसबाह उल्-हक (४९ चेंडू, ६५ धावा, ४ चौकार, २ षटकार) यांनी धावगती वाढवली. मंजुला गुरुगेच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात मिसबाह बाद झाला. आफ्रिदीने ७ चेंडूंमध्ये २ षटकार व १ चौकार ठोकून नाबाद २१ धावांची खेळी केली. यूएईतर्फे गुरुगे सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५६ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना यूएई संघाची सुरुवात निराशाजनक झाली.त्यांची १० षटकांत ३ बाद २५ अशी अवस्था झाली होती. खुर्रम व शायमन यांनी चौथ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी करून डाव सावरला. मकसूदने खुर्रमला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. यूएई संघासाठी सकारात्मक बाब म्हणजे, या लढतीत त्यांना ५० षटके फलंदाजी करण्यात यश आले. (वृत्तसंस्था)आफ्रिदीने पूर्ण केल्या आठ हजार धावा व ३०० बळींचा टप्पानेपियर : पाकिस्तानचा अष्टपैलू शाहीद आफ्रिदीने वन-डे क्रिकेटमध्ये आठ हजार धावा, ३०० बळींचा टप्पा गाठला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. आफ्रिदीने युएईविरुद्ध बुधवारी विश्वकप स्पर्धेत नाबाद २१ धावांची खेळी करताना हा विक्रम नोंदवला. श्रीलंकेच्या सनथ जयसूर्यानंतर अशी कामगिरी करणारा आफ्रिदी दुसरा खेळाडू ठरला आहे. आफ्रिदी वन-डे क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा पल्ला गाठणारा पाकिस्तानचा चौथा फलंदाज ठरला आहे. ३५ वर्षीय आफ्रिदीने आतापर्यंत ३९५ सामने खेळताना ८०१९ धावा फटकाविल्या आहेत. आफ्रिदीपेक्षा सईद अन्वर (८८२४), मोहम्मद युसूफ (९५५४) आणि इंजमाम उल-हक (११८०१) या पाकिस्तानच्या फलंदाजांनी अधिक धावा फटकाविल्या आहेत. जयसूर्याने आपल्या कारकीर्दीत ४४५ सामने खेळताना १३४३० धावा फटकाविल्या आहेत. या व्यतिरिक्त त्याने ३२३ बळी घेतले आहे. आफ्रिदीने ३९५ सामन्यांत ८०१९ धावा फटकाविल्या असून, त्याने ३९५ बळी घेतले आहेत. पाकिस्तान :- नासीर जमशेद झे. खान गो. गुरुगे ०४, अहमद शहजाद धावाबाद ९३, हॅरिस सोहेल झे. अन्वर गो. नवीद ७०, सोहेल मकसूद झे. मुस्तफा गो. गुरुगे ४५, मिसबाह उल्-हक झे. मुस्ताफा गो. गुरुगे ६५, उमर अकमल झे. अली गो. गुरुगे १९, शाहीद आफ्रिदी नाबाद २१, वहाब रियाज नाबाद २६. अवांतर : १६. एकूण : ५० षटकांत ६ बाद ३३९. बाद क्रम : १-१०, २-१७०, ३-१७६, ४-२५१, ५-३१२, ६-३१२. गोलंदाजी : नबीद १०-०-५०-१, गुरुगे ८-०-५६-४, जावेद ९-०-७६-०, तौकीर १०-०-५२-०, खान ३-०-२१-०, चंद्रन ८-०-५८-०, मुस्तफा २-०-२३-०. यूएई :- अमजद अली त्रि. गो. राहत १४, अँड्री बेरनगर झे. अकमल गो. सोहेल २, कृष्णा चंद्रन झे. अकमल गो. सोहेल ०, खुर्रम खान झे. वहाब गो. मकसूद ४३, शायमन अन्वर झे. जमशेद गो. आफ्रिदी ६२, स्वप्निल पाटील त्रि. गो. रियाज ३६, रोहन मुस्ताफा झे. शहजाद गो. आफ्रिदी ०, अमजद जावेद झे. सोहेल गो. वहाब ४०, मोहंमद नवीद नाबाद ०, मोहंमद तौकीर नाबाद ०. अवांतर : १३. एकूण : ५० षटकांत ८ बाद २१०. बाद क्रम : १-१९, २-१९, ३-२५, ४-१०८, ५-१४०, ६-१४०, ७-२०८, ८-२१०. गोलंदाजी : इरफान ३-१-२-०, सोहेल ९-२-५४-२, राहत १०-०-३०-१, बहाब १०-१-५४-२, आफ्रिदी १०-१-३५-२, मकसूद ५-०-१६-१, हॅरिस ३-०-१८-०.