ऑनलाइन लोकमतपुणे : एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू लिएंडर पेस गुरूवारी दुहेरीत पराभत झाल्याने तो स्पर्धेबाहेर झाला. एकेरीत प्रजनीश गुन्नेस्वरण याने उपांत्य फेरीत धडक दिली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. दुहेरी गटामध्ये उपांत्यपूर्व फेरीत लुका मर्गरोली व ह्यूगो न्यास यांनी पेस-रामकुमार रामनाथन या दुसऱ्या मानांकित जोडीवर २-६, ६-३ (१०-४) ने मात केली. अव्वल मानांकित पुरव राजा व दिवीज शरण या अव्वल मानांकित जोडीने मारट देवियातीयरोव व दिमित्री पॉपको यांना ७-६ (०), ६-४ ने मनवून उपांत्य फेरी गाठली.
एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत २६ वर्षीय प्रजनीशने तिसऱ्या मानांकित साकेत मायनेनीचा टायब्रेकमध्ये ६-७ (५), ६-२, ६-०ने पराभव केला. हा सामना १ तास ३२ मिनिटे चालला. ३५९ व्या मानांकित फ्रान्सच्या सादिओ डुबिंया याने १०८व्या मानरंकित रशियाच्या एव्हेग्नी डॉंस्कॉय याच्यावर ३-६, ६-४, ६-४ने वजिय मिळवला. इतर निकाल : उपांत्यपूर्व फेरी :एकेरी : निकोला मिलोजेविच (सर्बिया) विवि अॅड्रियन मेनेझडेझ (स्पेन) ६-४, ७-६ (३). डुक ली (कोरिया) विवि दिमित्री पॉपको (कझाकस्तान) ६-३, ६-४.
दुहेरी गट : पुरव राजा-दिवीज शरण (भारत) विवि मारट देवियातीयरोव-दिमित्री पॉपको (कझाकस्तान) ७-६, ६-४;लुका मर्गरोली-ह्यूगो न्यास विवि लिएंडर स्पेस-रामकुमार रामनाथन (भारत) २-६, ६-३ (१०-४).