शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

सत्पाल सिंग यांना पद्मभूषण

By admin | Updated: March 31, 2015 00:07 IST

दोन वेळा आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या सुशिलकुमारचे प्रशिक्षक भारतीय कुस्ती क्षेत्रात योगदान दिलेले सत्पाल सिंग यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

नवी दिल्ली : दोन वेळा आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या सुशिलकुमारचे प्रशिक्षक भारतीय कुस्ती क्षेत्रात योगदान दिलेले सत्पाल सिंग यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सोमवारी सन्मानित करण्यात आले. याचबरोबर भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंग, स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांच्यासह महिला गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले. राष्ट्रपती भवनमध्ये आयोजित समारंभात सरदार व सिंधू यांच्याव्यतिरिक्त महिला क्रिकेटपटू मिताली राज, महिला हॉकी खेळाडू सबा अंजुम यांनासुद्धा पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.(वृत्तसंस्था) सत्पाल सिंग (पद्मभूषण)माजी आशियाई सुवर्णपदकविजेते. दोन वेळा आॅलिम्पिक सुवर्णपदक मिळवणाऱ्या सुशीलकुमारचे प्रशिक्षक. ५९ वर्षीय सत्पाल सिंग यांनी भारतीय कुस्तीच्या इतिहासात ऐतिहासिक योगदान दिले आहे. १९७४ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी कास्य आणि त्यानंतर १९८२ मध्ये ‘सुवर्णमय’ कामगिरी केली होती. भारताच्या या पारंपरिक खेळाला पुढे नेण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या कल्पनेतूनच छत्रसाल येथे ‘आखाडा’ तयार झाला. त्यातून पुढे सुशीलकुमारसारखा ‘हिरा’ भारताला गवसला. १६ वेळा राष्ट्रीय चॅम्पियन असलेल्या सतपाल सिंग यांना १९७४ मध्ये अर्जुन आणि १९८३ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २००९ मध्ये त्यांना द्रोणाचार्य पुरस्कारही मिळाला आहे.सरदार सिंग(पद्मश्री)भारतीय हॉकी संघाचा कर्णधार. भारतीय हॉकी संघातील सध्याचा सर्वात अनुभवी खेळाडू. २००६ पासून आतापर्यंत २०० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा मान. २०१२ मध्ये अर्जुन पुरस्काराने गौरव. २८ वर्षीय सरदार सिंगने २००६ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापासून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. सबा अंजूम(पद्मश्री)ंभारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार. देशातील सर्वाेत्कृष्ट ‘फारवर्ड.’ २००२ मध्ये आशियाई, २००४ मध्ये आशिया चषक, २००२ आणि २००६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व. २००१ च्या ज्युनियर विश्वचषकातही उत्कृष्ट प्रदर्शन. पी. व्ही. सिंधू (पद्मश्री)भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात झपाट्याने शिखर गाठणारी खेळाडू म्हणजे पी. व्ही. सिंधू. कोपनहेगन येथील विश्वबॅडमिंटन स्पर्धेत कास्यपदक पटकावत तिने छाप सोडली होती. जागतिक स्पर्धेत दोन पदके मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. जानेवारी २०१४ मध्ये लखनऊ येथील इंडिया ग्रांप्री स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देत तिने टॉप टेनमध्येही प्रवेश मिळवला. नोव्हेंबरमध्ये मकाऊ ओपन ग्रांप्री स्पर्धा जिंकली. राष्ट्रकुल स्पर्धेतही याने रौप्यपदक मिळविले.