शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

न्यूझीलंडकडून पाकला व्हाइटवॉश

By admin | Updated: February 4, 2015 01:53 IST

न्यूझीलंड संघाने दुसऱ्या एकदिवसीय लढतीत पाकिस्तानचा ११९ धावांनी पराभव करून विजय नोंदवीत २-०ने मालिका जिंकली.

नेपियर : केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांची आक्रमक शतकी खेळी आणि नंतर टीम साउदी, एडम मिल्ने, नॅथन मॅक्युलम, ग्रॅन्ट एलियोट यांनी घेतलेल्या प्रत्येकी दोन विकेटच्या जोरावर न्यूझीलंड संघाने दुसऱ्या एकदिवसीय लढतीत पाकिस्तानचा ११९ धावांनी पराभव करून विजय नोंदवीत २-०ने मालिका जिंकली. मॅकलिन पार्कच्या मैदानावर नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा कर्णधार मॅक्युलमने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय मार्टिन गुप्तील (७६), विलियम्सन (८८ चेंडूंत १४ चौकार व १ षटकाराच्या साहाय्याने ११२) आणि रॉस टेलर (७० चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०२) यांनी सार्थक ठरविला. या तिघांच्या धुवाधार फलंदाजीमुळे न्यूझीलंडने ५० षटकांत ५ बाद ३६९ धावांपर्यंत मजल मारली. त्यांच्या ग्रॅन्ट एलिओटने २८ धावा केल्या. त्याने २१ चेंडूंत दोन षटकार ठोकले. रॉन्ची शून्यावर बाद झाला, तर एनएल मॅक्युलम ९ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानकडून मोहम्मद इरफानने ५२ धावांत २ गडी बाद केले. त्यांच्या शाहिद आफ्रिदीने, एसान अदिल, अहमद शेहजादने प्रत्येकी एक बळी घेतला. ३७० धावांचे आव्हान घेऊन फलंदाजीस मैदानावर उतरलेल्या पाक संघाचा डाव ४३.१ षटकांत सर्वबाद २५० धावांत संपुष्टात आला. पाककडून मोहम्मद हाफिज व अहमद शेहजादने आघाडीला फलंदाजीस येऊन अनुक्रमे ८६ व ५५ धावांची खेळी करून आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली. हाफिजने ८९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकार मारले. त्यानंतर फक्त कर्णधार मिसबाह उल हकहाच ४५ धावा करू शकला. (वृत्तसंस्था)न्यूझीलंड : ५० षटकांत ५ बाद ३६९़ (मार्टिन गुप्तील ७६, केन विलियम्सन ११२, रॉस टेलर नाबाद १०२, ब्रॅन्डेन मॅक्युलम ३१़ मोहंमद इरफान २/५२, अहमद शहजाद १/२९)़पाकिस्तान : ४३़१ षटकांत सर्वबाद २५०़ (मोहंमद हाफिज ८६, अहमद शहजाद ५५, मिस्बाह उल हक ४५़ टीम साउथी २/५२, अ‍ॅडम मिल्ने २/५२, नॅथन मॅक्युलम २/३३)़