शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

उद्घाटन सोहळ्यात संस्कृती आणि रंगांची उधळण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 03:29 IST

भारताला प्रथमच मिळालेले विश्व बॉक्सिंगचे आयोजन अविस्मरणीय ठरविण्यासाठी दिमाखदार उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला.

भारताला प्रथमच मिळालेले विश्व बॉक्सिंगचे आयोजन अविस्मरणीय ठरविण्यासाठी दिमाखदार उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला. आयोजन स्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोहंमद तय्यबुद्दीन हॉकी स्टेडियम हजारो स्थानिक आणि विदेशी नागरिकांच्या साक्षीने तब्बल दोन तास रंगलेल्या या सोहळ्यात आसामच्या सांस्कृतिक आणि संगीत परंपरेसह भारतीय संगीताची मेजवानी सादर करण्यात आली. सोबतीला बॉलिवूड तडका होता. प्रसिद्ध गायक शान आणि स्थानिक लोकप्रिय गायक शिमांतो शेखर यांनी एकाहून एक सरस गाणी गाऊन प्रेक्षकांना धमाल करायला भाग पाडले. जगभरातून आलेल्या खेळाडूंनीदेखील संगीत आणि नृत्याच्या तालावर थिरकत सोहळ्याचा आनंद लुटला.आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी स्पर्धा सुरू झाल्याची घोषणा करताच टाळ्यांचा पाऊस पडला. या वेळी एआयबीए उपाध्यक्ष एडगर तानेर, भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष अजयसिंग, बीएफआय उपाध्यक्ष हेमंत कलिता, स्पर्धेची ब्रँडदूत आणि पाच वेळेची विश्व चॅम्पियन बॉक्सर खासदार मेरी कोम यांच्यासोबत सोनोवाल यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री व्यासपीठावर होते. काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहणार नाही, असे आधी सांगणारी मेरी कोम हिची उपस्थिती मात्र अनेकांना सुखद धक्का देणारी होती. कार्यक्रमाच्या शेवटी तब्बल अर्धा तास नयनरम्य आतषबाजी करण्यात आली.