शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
6
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
7
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
8
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
9
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
10
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
11
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
12
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
13
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
14
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
15
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
16
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
17
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
18
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
19
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
20
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

एक धक्का और दो...

By admin | Updated: March 31, 2016 03:18 IST

यजमान भारत आणि धमाकेदार वेस्ट इंडिज हे दोन तुल्यबळ संघ गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य लढतीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

मुंबई : यजमान भारत आणि धमाकेदार वेस्ट इंडिज हे दोन तुल्यबळ संघ गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य लढतीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. ‘उपांत्यपूर्व फेरी’त बलाढ्य आॅस्ट्रेलियाला अविश्वसनीय धूळ चारल्यानंतर अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला वेस्ट इंडिजला एक धक्का और देण्याची गरज आहे.सर्वांचे लक्ष असेल ते भारताच्या विराट कोहली आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल यांच्या खेळीकडे. या दोघांच्या कामगिरीवर दोन्ही संघांचा विजय अवलंबून असेल. एका बाजूला गोलंदाजांचा फडशा पाडण्यासाठी क्रिकेटचा गॉडझिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गेलचे हात शिवशिवत असतील, तर दुसऱ्या बाजूला प्रतिकूल परिस्थितीत आपल्या उच्च दर्जाच्या फलंदाजीने संघाला विजयाच्या ‘विराट’ मार्गावर आणण्यासाठी कोहली सज्ज आहे. भारताच्या स्पर्धेतील आतापर्यंतच्या वाटचालीत कोहलीचा सिंहाचा वाटा असल्याने त्याला रोखण्याचे मुख्य आव्हान विंडीजपुढे असून, कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे कल्पक नेतृत्वही विंडीजसाठी मोठा अडथळा आहे. रोहित शर्मा-शिखर धवन यांनी अद्याप आपल्या क्षमतेनुसार खेळ केला नाही. सुरेश रैनाकडूनही भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यातच अनुभवी अष्टपैलू युवराज सिंग जखमी झाल्याने संघाबाहेर गेला असून, त्याच्या जागी आलेल्या मनीष पांडेवर मोठी जबाबदारी असेल. तरी मुंबईकर अजिंक्य रहाणेला संधी न दिल्याबद्दल मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. घरच्या मैदानावर त्याचा अनुभव भारताला फायदेशीर ठरला असता. त्यामुळे अंतिम संघात त्याला संधी मिळते की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. गोलंदाजीत भारताचे मुख्य अस्त्र रविचंद्रन आश्विनचे असेल. दुसरीकडे स्पर्धेआधी आपल्या बोर्डसह झालेल्या आर्थिक वादामुळे विंडीजचे मुख्य खेळाडू विश्वचषक न खेळण्याच्या पवित्र्यात होते. मात्र, स्पर्धेला सुरुवात होताच त्यांनी धमाकेदार कामगिरीसह उपांत्य फेरी गाठली. तरी अखेरच्या साखळी सामन्यात दुबळ्या अफगानविरुद्धचा पराभव त्यांना सलत आहे. धडाकेबाज आंद्रे फ्लेचर संघाबाहेर गेल्याने त्यांना मोठा फटका बसला आहे. त्याच्या जागी आलेला लेंडल सिमन्सचा विंडीजला फायदा होईल. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सिमन्सला वानखेडे खेळपट्टीचा चांगला अनुभव आहे. (क्रीडा प्रतिनिधी)यातून निवडणार संघ...भारत ...महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, हरभजनसिंग, रविचंद्रन आश्विन, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, आशीष नेहरा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, पवन नेगी, मोहमद शमी. वेस्ट इंडिज ...डॅरेन सॅमी (कर्णधार), सॅम्युएल बद्री, सुलेमान बेन, कार्लोस ब्रेथवेट, ड्वेन ब्राव्हो, जॉन्सन चार्ल्स, लेंडल सिमन्स, ख्रिस गेल, जेसन होल्डर, एव्हिन लुईस, अ‍ॅश्ले नर्स, दिनेश रामदीन, आंद्रे रसेल, मरलॉन सॅम्युएल्स, जेरोम टेलर .भारतीय खेळाडूंची फलंदाजी...विराट कोहली : आॅस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ८२ धावांची आक्रमक खेळी बांगलादेशविरुद्ध २४ धावा पाकिस्तानविरुद्ध नाबाद ५५ धावांची दमदार खेळी न्यूझीलंडविरुद्ध २३ धावामहेंद्रसिंह धोनी : आॅस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १८बांगलादेशविरुद्ध नाबाद १३पाकविरुद्ध नाबाद १३न्यूझीलंडविरुद्ध ३० धावा शिखर धवन : आॅस्ट्रेलिया १३ बांगलादेश २३गोलंदाजी...हार्दिक पंड्या :आॅस्ट्रेलियाविरुध्द ३६ धावात २ विकेट बांगलादेशविरुद्ध २९ धावात २ विकेट आर. आश्विन : आॅस्ट्रेलियाविरुद्ध ३१ धावात १ विकेट बांगलादेशविरुद्ध २० धावात २ विकेट न्यूझीलंडविरुद्ध ३२ धावात १ विकेट आशिष नेहरा : आॅस्ट्रेलियाविरुद्ध २० धावात १ विकेट बांगलादेशविरुद्ध २९ धावात १ विकेटपाकिस्तानविरुद्ध २० धावात १ विकेट रविंद्र जडेजा :बांगलादेशविरुद्ध २२ धावात २ विकेट पाकिस्तानविरुद्ध २० धावात १ विकेट न्यूझीलंडविरुद्ध २६ धावात १ विकेट वेस्ट इंडिज फलंदाजी....जानसन चार्ल्सअफगानविरुद्ध २२ द. आफ्रिकाविरुद्ध ३२ख्रिस गेल इग्लंडविरुद्ध ९४ चेंडूत नाबाद १००मर्लोन सॅम्युलद. आफ्रिकेविरुद्ध ४३इंग्लंडविरुद्ध ३७ड्वेन ब्रावो :अफगाणिस्तानविरुद्ध २८गोलंदाजी...सॅम्युल बद्री .अफगाणिस्तानविरुद्ध १४ धावात ३ विकेटआंद्रे रसेलअफगाणिस्तानविरुद्ध २३ धावात २ विकेटइंग्लंडविरुद्ध ३६ धावात २ विकेट ड्वेन ब्रावोद. आफ्रिकेविरुध्द २० धावात २ विकेट श्रीलंकेविरुद्ध २० धावात २ विकेटइंग्लंडविरुद्ध ४१ धावात २ विकेट ख्रिस गेलद. आफ्रिकाविरुध्द १७ धावात २ विकेटउपांत्य फेरीपर्यंतची वाटचाल...भारत : - आॅस्ट्रेलियाविरुद्ध ६ विकेटने विजयी - बांगलादेशविरुद्ध १ धावेने विजयी - पाकिस्तानविरुद्ध ६ विकेटने विजयी - न्यूझीलंडकडून ४७ धावांनी पराभूत वेस्ट इंडिज :- अफगाणिस्तानकडून ६ धावांनी पराभूत - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ विकेटने विजयी- श्रीलंकेविरुद्ध ७ विकेटने विजयी- इंग्लंडविरुद्ध ६ विकेटने विजयी सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा. स्थळ : वानखेडे