शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
5
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
6
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
7
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
8
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
10
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
11
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
12
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
13
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
14
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
15
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
16
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
17
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
18
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
19
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
20
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट

एका धावेने वेस्ट इंडिजकडून भारताचा पराभव

By admin | Updated: August 27, 2016 23:39 IST

थरारक लढतीत शेवटच्या चेंडूवर भारताला वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला. टी 20 च्या पहिल्याच सामन्यात भारताला अवघ्या एका धावेने पराभव झाला.

- ऑनलाइन लोकमत 
फ्लोरिडा, दि. 27 - थरारक लढतीत शेवटच्या चेंडूवर भारताला वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला. टी 20 च्या पहिल्याच सामन्यात भारताला अवघ्या एका धावेने पराभव झाला. 
वेस्ट इंडिजने भारतासमोर ठेवलेलं 246 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याचा पाठलाग करताना भारताच्या के. एल. राहुल आणि महेंद्रसिंह धोनी यांनी शानदार खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. मात्र, थरारक अशा लढतीत शेवटच्या एका धावेमुळे भारताला वेस्ट इंडीजकडून पराभव पत्करावा लागला. यामुळे के. एल. राहुलची शतकी खेळी अपयशी ठरली. या सामन्यात के. एल. राहुलने या सामन्यात पाच षटकार लगावत 51 चेंडूत 110 धावा केल्या. तर धोनीने 25 चेंडूत 43 धावा केल्या. टी 20 मध्ये शतक करणारा के. एल. राहुल तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. भारताने या सामन्यात 20 षटकात चार बाद 244 धावा केल्या.
वेस्ट इंडिजने सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांना वरचढ होऊ दिलं नाही. ओपनिंग करणा-या चार्ल्स आणि लुईसने पहिल्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली होती. पाचव्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरच वेस्ट इंडिजच्या 50 धावा पूर्ण झाल्या होत्या. लुईसने तर फक्त 48 चेंडूत शतक पुर्ण केलं. वेस्ट इंडिजने 246 धावा केल्या आहेत. सुरुवातीला स्फोटक फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारणारे वेस्ट इंडिजचे फलंदाज शेवटच्या ओव्हर्समध्ये धावा करण्यात अपयशी ठरले. शेवटच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजने आपल्या तीन विकेट्स गमावल्या. 245 धावांसोबत वेस्ट इंडिजने टी 20 मध्ये भारताविरोधातील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड केला आहे. 
टॉस जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी मिळाल्याचा पुरेपूर फायदा घेत भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. भारताने पाठलाग करताना सुरुवातीलाच अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीची विकेट गेल्याने भारत संघ पराभवाच्या छायेत होता, मात्र रोहित शर्माने स्फोटक खेळी करत भारतीय संघाला सावरलं. रोहित शर्माने 28 चेंडूत 62 धावा केल्या. 
भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली. रवींद्र जाडेजा आणि बुमराहने प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या तर भुवनेश्वरने एक विकेट घेतली.
शनिवार आणि रविवारी फ्लोरिडात दोन सामन्यांची मालिका होत असून दोन्ही संघांमधील रेकॉर्डवर नजर टाकल्यास आकडेवारीत विंडीजला झुकते माप आहे. दुसरीकडे कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ विजयी रथावर स्वार झालेला दिसतो. दोन्ही संघांत पाच टी-२० सामने झाले. त्यातील तीन विंडीजने तर २ भारताने जिंकले आहेत.
यंदा भारतात झालेल्या विश्वचषकात विंडीजकडून मुंबईत भारताला पराभवाचा धक्का बसला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया जखमी वाघाप्रमाणे तुटून पडणार आहे. भारताकडे दिग्गज खेळाडूंची उणीव नाही. कसोटी मालिका जिंकल्यानंतर आत्मविश्वास देखील उंचावला. विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन हे खेळाडू झटपट प्रकारातही उपयुक्त ठरू शकतात. भारताने अलीकडे आॅस्ट्रेलिया आणि लंकेविरुद्ध टी-२० त देखणी कामगिरी केली आहे. १४ सदस्यांच्या भारतीय संघात झालेला सर्वांत मोठा बदल म्हणजे कर्णधार बदलणे हा आहे. त्यामुळे विंडीजकडून विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवाची परतफेड यानिमित्ताने भारत करणार आहे.
अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय लोक राहतात. यामुळे भारताला व्यापक पाठिंबा मिळेल. दुसरीकडे चांगल्या कामगिरीचेही दडपण राहणार आहे. धोनी आव्हान समर्थपणे पेलतो, पण गेल्या काही महिन्यांपासून तो मैदानाबाहेर होता, हे देखील नाकारता येणार नाही.