शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 15:15 IST

नायब सुभेदार रँकसह ते लेफ्टनंट कर्नल!

Olympic Medallist Javelin Thrower Neeraj Chopra Honorary Rank Of Lieutenant Colonel : जगातील मानाची स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दोन हंगामात भारताला पदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्राच्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारताच्या गोल्डन बॉयला बुधवारी भारतीय लष्करातील मानद लेफ्टिनंट कर्नल पद देण्यात आले. दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत नीरज चोप्राला लष्करातील नवी रँक देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मिळणारा नीरज चोप्रा हा मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

नायब सुभेदार रँकसह ते लेफ्टनंट कर्नल!

‘द गॅझेट ऑफ इंडिया’ (सरकारी माहिती पत्र) नुसार, नीरज चोप्राची ही नियुक्ती १६ एप्रिल पासून प्रभावी झाली. २६ ऑगस्ट २०१६ रोजी ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरच्या रुपात नायब सुभेदार रँकसह त्याचा लष्करातील प्रवास सुरु झाला होता. २०२० मध्ये पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केल्यावर २०२१ मध्ये नीरज चोप्रा सुभेदार पदावर बढती देण्यात आली होती. याशिवाय त्याला उत्कृष्ट सेवेसाठी खेलरत्न आणि विशिष्ट सेवा पदकासह सन्मानित करण्यात आले आहे. आता तो लष्करात लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत पोहचला आहे. 

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत मोठी संधी हुकली

दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील आपल्या जेतेपदाचा बचाव करण्यात अपयशी ठरला होता. या स्पर्धेतील गत चॅम्पियन असलेल्या नीरज चोप्राला सलग दोन वेळा जेतेपदासह नवा इतिहास रचण्याची संधी होती. पण यंदाच्या स्पर्धेत ८४.०३ मीटर भाला फेकीसह त्याला आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

नीरज चोप्राची खेळाच्या मैदानातील उल्लेखनिय कामगिरी

  • टोकियो ऑलिंपिक २०२०-सुवर्णपदक- (पुरुष भालाफेक प्रकारात ८७.५८ मीटर अंतर भाला फेकत सुवर्ण पदक जिंकून देणारा भारताचा पहिला ॲथलेटिक्स) 
  • पॅरिस ऑलिम्पिक २०२४ - रौप्य पदक (सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धा गाजवणारा भारताचा पहिला ॲथलेटिक्स )
  • आशियाई क्रीडा स्पर्धा  २०१८ (जकार्ता- ८८.०६ मीटर भाला फेकीसह सुवर्णपदक) 
  • कॉमनवेल्थ गेम्स २०१८ (गोल्ड कोस्ट) -सुवर्णपदक.
  • वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२ (यूजीन, अमेरिका)- रौप्यपदक ( या स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष ॲथलीट)
  • वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ (बुडापेस्ट)-सुवर्णपदक ( या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी नोंदवणारा पहिला भारतीय.
  • डायमंड लीग चॅम्पियन २०२२ -हंगामातील सर्वात सातत्यपूर्ण खेळाडू म्हणून विजेता.
  • आर्मी गेम्स आणि आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धा (२०१७)- सुवर्णपदक.
  • ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप (२०१६, पोलंड) — ८६.४८ मीटर फेकसह सुवर्ण पदक
  • दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा (२०१६)- सुवर्णपदक  

 नीरज चोप्राला मिळालेले प्रमुख पुरस्कार

  • राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार (२०२१) -भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान.
  • पद्मश्री (२०२२)- भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान.
  • अर्जुन पुरस्कार (२०१८) उत्कृष्ट कामगिरीसाठी.
  • परम विशिष्ट सेवा पदक (२०२२) -भारतीय सैन्याकडून विशेष सन्मान.
  • भारतीय लष्करात मानद लेफ्टनंट कर्नल पदवी (२०२४) 
English
हिंदी सारांश
Web Title : Neeraj Chopra Honored as Lieutenant Colonel by Indian Army

Web Summary : Neeraj Chopra, Olympic medalist, is now an honorary Lieutenant Colonel. He was honored by Defence Minister Rajnath Singh and Army Chief General Upendra Dwivedi in Delhi. He joined as Naib Subedar and was promoted to Subedar after his Olympic gold. He missed defending his title at the World Athletics Championships.
टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राRajnath Singhराजनाथ सिंह