शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिक उद्घाटन समारंभ साधाच

By admin | Updated: August 3, 2016 04:18 IST

आॅलिम्पिकचा उद्घाटन सोहळा हा भव्य-दिव्य व नेत्रदीपक म्हणून संस्मरणीय ठरतो

रिओ : आॅलिम्पिकचा उद्घाटन सोहळा हा भव्य-दिव्य व नेत्रदीपक म्हणून संस्मरणीय ठरतो, पण ५ आॅगस्टपासून प्रारंभ होणाऱ्या रिओ आॅलिम्पिक उद््घाटन समारंभात ही परंपरा मोडीत निघणार आहे. रिओ आॅलिम्पिक उद््घाटन समारंभाचे कार्यकारी निर्माते मार्को बॅलिच यांनी सांगितले की, ‘माराकाना स्टेडियममध्ये होणारा उद््घाटन समारंभ ब्राझीलची सध्याची परिस्थिती आणि आर्थिक स्थितीचा विचार करून आयोजित करण्यात येणार आहे.’बॅलिस २०१४ च्या सोची शीतकालीन आॅलिम्पिक खेळासह अनेक स्पर्धांच्या समारंभासोबत जुळलेले आहेत. बॅलिच म्हणाले,‘ब्राझीलची सध्याची स्थिती बघता उद््घाटन समारंभ भव्य-दिव्य राहणार नाही. ब्राझील सध्या १९३० च्या दशकानंतर सर्वांत मोठ्या आर्थिक मंदीत सापडला आहे. स्पर्धेच्या आयोजकांना आर्थिक चणचण जाणवत आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी कंबर कसली आहे. रिओ आॅलिम्पिक उद््घाटन समारंभात बीजिंगची भव्यता, अथेन्स आॅलिम्पिकचा स्पेशल इफेक्ट््स आणि लंडन आॅलिम्पिकची तांत्रिक कुशलता अनुभवायला मिळणार नाही. हा समारंभ आमच्या देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीनुसार होणार आहे.’रिओ आॅलिम्पिकच्या उद््घाटन समारंभाला २.१ कोटी डॉलर्स खर्च अपेक्षित आहे तर चार वर्षांपूर्वी झालेल्या लंडन आॅलिम्पिकच्या उद््घाटन समारंभाला ४.२ कोटी डॉलर्स खर्च आला होता.उद््घाटन समारंभ ‘सातत्य, ब्राझीलच्या नागरिकांचे हास्य आणि भविष्यातील आशा’ या संदेशावर आधारित आहे. बॅलिच पुढे म्हणाले,‘ब्राझीलमध्ये जगातील शेवटचे मोठे जंगल अमेजन रेन फॉरेस्ट आहे. या जंगलाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आम्ही ‘आशेचा संदेश’ या माध्यमातून जगाचे याकडे लक्ष वेधण्यास प्रयत्नशील आहोत. स्पेशल इफेक्ट््सविनाही आम्ही लोकांसोबत भविष्याबाबत संवाद साधू शकतो. ब्राझील किती चांगला व आधुनिक आहे, हे आम्हाला दाखवायचे नाही.’’ आॅलिम्पिकच्या उद््घाटन समारंभाबाबत अखेरच्या वेळेपर्यंत गुप्तता पाळल्या जाते आणि अखेरच्या सेकंदलाही आॅलिम्पिक ज्योत कोण प्रज्वलित करणार, याची माहिती नसते. बॅलिच म्हणाले,‘आॅलिम्पिक ज्योत पूर्वीच्या आॅलिम्पिक समारंभाप्रमाणे भव्य राहणार नाही. पूर्वीच्या आॅलिम्पिकमध्ये ज्योतीच्या ज्वाला अनेक मैलापासून दिसत होत्या.’ आॅलिम्पिक ज्योतीमध्ये यावेळी मोठ्या ज्वाला राहणार नाहीत. आम्ही सातत्याची चर्चा करीत असताना विनाकारण गॅस वाया घालविण्यात काही अर्थ नाही. ही एक लहान आॅलिम्पिक ज्योत राहणार आहे. आॅलिम्पिक ज्योत स्टेडियममध्ये उपस्थितांना बघता येणार आहे. त्याची एक प्रतिकृती रिओमध्ये लावण्यात येणार असून चाहत्यांना तेथे छायचित्र काढता येईल, अशेही बॅलिच यांनी यावेळी सांगितले. उद््घाटन समारंभात ४८०० कलाकार सहभागी होणार असून त्यांच्यासोबत स्पर्धेत सहभागी होणारे ११ हजार खेळाडू स्टेडियममध्ये दाखल होतील. ट्रॅकचा अभाव असल्यामुळे खेळाडू फुटबॉल क्षेत्रात एकत्रित होतील. समारंभाचे निर्माते म्हणाले,‘उद््घाटन समारंभात एक उद्देश असायला हवा. आम्ही सातत्य व भविष्याबाबत सकारात्मक विचार करायला हवा. अधिक भव्य-दिव्यता चांगली नाही. अशा कार्यक्रमामुळे अनेकांना आनंद होणार नाही, पण आम्ही साध्या पद्धतीने या समारंभाचे आयोजन करणार आहोत.’’(वृत्तसंस्था)