शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'तिने चुंबन घेतले आणि मी अडकलो', ऑलिम्पिक विजेता अमेरिकन धावपटू गिल रॉबर्टचा दावा लवादाला मान्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 13:10 IST

'मी प्रतिबंधित शक्तिवर्धक द्रव घेतलेले नाही, तर माझ्या मैत्रिणीने भावनेच्या वेगात घेतलेल्या चुंबनांच्या माध्यमातून ते माझ्या शरीरात आले असावेत. मी जाणूनबुजून ड्रग्ज घेतलेले नाहीत म्हणून मला निर्दोष मानून निलंबन रद्द करावे," असा दावा अमेरिकेचा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता धावपटू गिल रॉबर्ट याने केला

न्यू यॉर्क- 'मी प्रतिबंधित शक्तिवर्धक द्रव घेतलेले नाही, तर माझ्या मैत्रिणीने भावनेच्या वेगात घेतलेल्या चुंबनांच्या माध्यमातून ते माझ्या शरीरात आले असावेत. मी जाणूनबुजून ड्रग्ज घेतलेले नाहीत म्हणून मला निर्दोष मानून निलंबन रद्द करावे," असा दावा अमेरिकेचा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता धावपटू गिल रॉबर्ट याने केला आणि क्रीडा लवादाच्या पीठाने तो मान्यसुध्दा केला. त्यामुळे अमेरिकेला रिओ |लिम्पिकमध्ये 400 मीटर रिलेचे सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या या धावपटूचे निलंबन टळले. 

या गमतीशीर घटनेच्या मुळात आपल्या भारताचेही कनेक्शन आहे. पार्श्वभूमी अशी की 24 मार्च 2017 रोजी रॉबर्टची प्रतिबंधित द्रवासाठी अमेरिकन अँटी डोपींग एजन्सीतर्फे चाचणी घेण्यात आली आणि त्यात तो 'प्रोबेनेसीड' नावाचे प्रतिबंधीत द्रव सेवनप्रकरणी दोषी आढळला. त्यानंतर त्याचे बी सॅम्पलही पॉझिटिव्ह आले म्हणून त्याला मे 2017 पासून निलंबित करण्यात आले होते आणि या निलंबनाला त्याने दिलेल्या आव्हानावर अमेरिकेच्या 'द कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन ऑफ स्पोर्ट'समोर सुनावणी सुरु होती. त्या सुनावणीदरम्यान रॉबर्टने चुंबनाचा हा गमतीशीर दावा गुरुवारी केला आणि लवादाने तो मान्य करत जागतिक प्रतिबंधित द्रव विरोधी संस्था (वाडा) चा रॉबर्टला निलंबित करण्याचा निर्णय रद्दबातल ठरवला. 

आता यात भारताचा संबंध म्हणजे इंडियन कनेक्शन कुठे येते तर ते असे...रॉबर्टच्या मैत्रिणीच्या सावत्र वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार रॉबर्टच्या मैत्रिणीचे नाव अॅलेक्स सलाझार. ही बया मार्च 2017 च्या काही आठवडे आधी भारतात आली होती आणि तिला इकडे 'सायनस इन्फेक्शन' झाले. त्यामुळे स्थानिक केमिस्टने तिला दोन आठवड्यांसाठी दररोज 'मॉक्झिलाँग' कॅप्सूल घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अॅलेक्स ही औषधं घेत होती. भारतातून परतताना अमेरिकेतही तिने ही औषधी सोबत नेली आणि 24 मार्च 2017 रोजी नेमकी  रॉबर्टची चाचणी होण्याच्या तीन तास आधीच तिने ही कॕप्सूल घेतली होती. बरे ही कॅप्सूल ती गिळत नव्हती तर ती उघडून त्यातील पावडर पाण्यासह घेण्याची तिची पध्दत होती.

 त्यामुळे त्या 24 मार्चला तिने माझे चुंबन घेण्याआधी ही औषधी घेतलेली असावी आणि त्यामुळे माझ्या शरीरात प्रोबेनेसिड हे ड्रग मिळून आले असावे. या चुंबनामुळे मी गोत्यात येईल किंवा अॕलेक्स अशी काही औषधी घेतेय याची आपल्याला अजिबात कल्पना नव्हती असा दावा रॉबर्टने केला आणि तो मान्य करण्यात आल्याने त्याच्यावरील निलंबनाचे बालंट टळले. 

आश्चर्य म्हणजे चुंबनापायी असा अडचणीत आलेला आणि सहीसलामत सुटलेला गिल रॉबर्ट हा काही पहिलाच खेळाडू नाही. त्याच्याआधी टेनिसपटू रिचर्ड गास्केट व कॅनेडियन पोल व्हॉल्टर शॉन बार्बर हेसुध्दा अशाच चुंबनातून कोकेन सेवनाचे दोषी पकडले गेले होते परंतु त्यांचीही चुंबनकथा ऐकून सुटका झाली होती.