सर्वात वयोवृद्ध दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटर नॉर्मन गार्डन यांचे 103 व्या वर्षी निधन
By admin | Updated: September 2, 2014 19:35 IST
जोहान्सबर्ग: सर्वात वयोवृद्ध कसोटी क्रिकेटर दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज नॉर्मन गार्डन यांचे 103 व्या वर्षी मंगळवारी निधन झाल़े आपल्या जबरदस्त फिटनेस आणि खेळ भावनेसाठी प्रसिद्ध असलेले गार्डन पहिले कसोटी क्रिकेटर होते की जे 100 वर्षांहून अधिक काळ जीवित होत़े ट्रान्सवालच्या बोक्सबर्गमध्ये 6 ऑगस्ट 1911 मध्ये जन्मलेले गार्डन यांचे जोहान्सबर्ग ...
सर्वात वयोवृद्ध दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटर नॉर्मन गार्डन यांचे 103 व्या वर्षी निधन
जोहान्सबर्ग: सर्वात वयोवृद्ध कसोटी क्रिकेटर दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज नॉर्मन गार्डन यांचे 103 व्या वर्षी मंगळवारी निधन झाल़े आपल्या जबरदस्त फिटनेस आणि खेळ भावनेसाठी प्रसिद्ध असलेले गार्डन पहिले कसोटी क्रिकेटर होते की जे 100 वर्षांहून अधिक काळ जीवित होत़े ट्रान्सवालच्या बोक्सबर्गमध्ये 6 ऑगस्ट 1911 मध्ये जन्मलेले गार्डन यांचे जोहान्सबर्ग सिटी सेंटरजवळील हिलब्रोमध्ये स्थित त्यांच्या निवासस्थानी (103 वर्षे 27 दिवस) निधन झाल़े गार्डन यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ पाच कसोटीच खेळू शकले होत़े दुसर्या विश्व युद्धामुळे त्यांच्या कारकिर्दीवर परिणाम झाला होता़गार्डन यांनी 1938-39 मध्ये डरबन येथील त्या ऐतिहासिक कसोटीचे साक्षीदार होते की जो दहा दिवस चालूनदेखील ड्रॉ झाला होता़ दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यामध्ये ऐतिहासिक कसोटी सन 1939 मध्ये 3 मार्च ते 14 मार्चपर्यंत खेळला गेला होता़ गार्डन यांनी त्या सामन्यात शून्य आणि नाबाद 07 धावा केल्या होत्या़ ते पहिल्या डावात एकही बळी घेतले नव्हते मात्र दुसर्या डावात त्यांनी 174 धावा देताना एक बळी घेतला होता़ या सामन्यात त्यांनी 92़2 षटके टाकली होती़ त्यावेळी आठ चेंडूंचे एक षटक असायच़े