शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आता लक्ष्य ऑलिम्पिकच्या पात्रतेचे !

By admin | Updated: August 6, 2014 01:20 IST

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकल्यामुळे आत्मविश्वास उंचावला आहे.

पुणो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकल्यामुळे आत्मविश्वास उंचावला आहे. आता आम्ही 2क्16मध्ये रिओ दि जानेरो येथे होणा:या ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे, अशी प्रतिक्रिया ओम्कार ओतारी व गणोश माळी यांनी दिली.
ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत ओम्कार व गणोश या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये भारताला कांस्यपदके जिंकून दिली. ओम्कारने 69 किलो, तर गणोशने 56 किलो वजन गटामध्ये ही कामगिरी केली. रविवारी (दि. 3) रात्री पुण्यात दाखल झाल्यानंतर या दोघांचीही आज बाणोर रोडपासून म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ढोल-ताशे आणि डीजेच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ‘‘येत्या नोव्हेंबर महिन्यात कझाकिस्तानमध्ये ऑलिम्पिक पात्रता फेरीची स्पर्धा होत आहे. यात चांगली कामगिरी करून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीने आम्ही तयारीला लागणार आहोत. यापुढेही  वेटलिफ्टिंग प्रकारात देशासाठी अधिकाधिक पदके जिंकू,’’ असा निर्धार दोघांनीही मिरवणुकीनंतर ‘लोकमत’सोबत बोलताना व्यक्त केला. 
ओम्कार आणि गणोश हे दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड गावचे रहिवासी. हे दोघेही तेथील द हरक्युलस जिमचे खेळाडू. विशेष म्हणजे दोघांचे प्रशिक्षकही एकच. प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणोमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकू शकल्याची भावना ओम्कार व गणोश यांनी व्यक्त केली. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला कांस्यपदक जिंकून देणारा चंद्रकांत माळी हादेखील या दोघांचा गाववाला आणि गुरुबंधूदेखील आहे. मिरवणुकीनंतर क्रीडा उपसंचालक माणिक ठोसरे यांच्या हस्ते दोघांचाही सत्कार करण्यात आला. 
27वर्षीय ओम्कार हा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात प्रबोधिनीमध्ये वेटलिफ्टिंगचा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. 2क्1क्च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही ओम्कार खेळला होता. मात्र, त्यात त्याला पदक जिंकता आले नव्हते.  ‘‘2क्11मध्ये माङया आईचे निधन झाले. 2क्1क्च्या राष्ट्रकुल स्पर्धेत हुकलेले पदक जिंकून दाखवण्याचे वचन तिने माङयाकडून घेतले होते. वारंवार दुखापती होऊनही केवळ अन् केवळ तिच्या प्रेरणोमुळेच मी इथवर पोहोचू शकलो. राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान माङया पाठीला दुखापत झाली होती. त्याचा त्रस होऊ नये म्हणून मी प्रतिस्पध्र्याच्या क्षमतेचा अभ्यास करून आवश्यक तेवढेच वजन उचलले. मात्र, तरीही मला त्रस झालाच. खेळात हे चालायचेच. माङया यशाने प्रबोधिनीतील मुले खूश आहेत. त्यांच्यातील अनेकांनी माझी कामगिरी मागे टाकणारे यश मिळवावे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे, अशी भावनाही ओम्कारने व्यक्त केली. 
लाज:या स्वभावाच्या 21वर्षीय गणोशची वरिष्ठ स्तरावरील पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. पहिल्याच प्रयत्नात कांस्यपदक जिंकून त्याने आपल्याबद्दलच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. गणोश म्हणाला, ‘‘आमच्या कुटुंबातील अनेक जण जिममध्ये जात. मीदेखील त्यांचे अनुकरण केले. नंतर याची गोडी लागली. प्रदीप पाटील सरांनी मला मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदके जिंकण्याचे स्वप्न दाखवले व त्याच्या पूर्ततेसाठी माङयाकडून मेहनतही करून घेतली.’’ (क्रीडा प्रतिनिधी)
 
मिरवणूक विजयवीरांची : ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदके जिंकणा:या ओम्कार ओतारी व गणोश माळी यांची सोमवारी (दि. 4) सायंकाळी बाणोर रस्त्यापासून म्हाळुंगे-बालेवाडी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलार्पयत ढोल-ताशे व डीजेच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या विजयवीरांचे कौतुक करण्यासाठी की काय पावसानेही जोरदार हजेरी लावली होती. मुसळधार पावसातही डीजेच्या तालावर जल्लोषात नाचताना शिवछत्रपती क्रीडा संकुलातील प्रबोधिनीचे खेळाडू. डावीकडे मिरवणुकीदरम्यान (डावीकडून) गणोश आणि ओम्कार.