शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

एमसीएला नोटीस !

By admin | Updated: June 9, 2015 02:16 IST

भूखंडाचा वापर व्यावसायिक कामासाठी केल्याच्या कारणास्तव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एमसीएला नोटीस बजावली आहे.

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील १३ एकरांचा भूखंड मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) शैक्षणिक कामासाठी दिलेला असताना संबंधितांनी मात्र भूखंडाचा वापर व्यावसायिक कामासाठी केल्याच्या कारणास्तव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एमसीएला नोटीस बजावली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकारान्वये ही माहिती प्राप्त झाली आहे. एमसीएला दिलेल्या भूखंडाची माहिती त्यांनी एमएमआरडीएकडे विचारली होती. प्राधिकरणाने ५ मार्च २००४ रोजी एमसीएला ८० वर्षांच्या भाडेकरारावर ५२ हजार १५७ चौरस मीटर भूखंड दिला. त्यासाठी २ कोटी ६५ लाख ९८ हजार २०२ रुपये एवढे शुल्क आकारले. त्यापैकी ४६ हजार ९४१ चौरस मीटर खुले मैदान आणि ५ हजार २१५.७ चौरस मीटर बांधकामासाठी देत १.५ चटईक्षेत्र निर्देशांकाला मंजुरी दिली. १० टक्के जमिनीवर १५ टक्के बांधकाम, २३ टक्के जमीन ही तलाव, टेनिस कोर्ट, नेट्स किंवा तत्सम वापर आणि ६७ टक्के जागा सार्वजनिक वापरासाठी खुली ठेवण्यासह इनडोअर क्रिकेट अकादमीमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश खुला ठेवावा, असे एमएमआरडीएने म्हटले. मात्र, एमसीएने हा भूखंड व्यावसायिक प्रयोजनार्थ न वापरण्याच्या अटीचे उल्लंघन करीत व्यावसायिक करारनामा केला. हे लक्षात घेता ‘तीन महिन्यांच्या आत योग्य पावले उचला किंवा भाडेकरार समाप्त करू,’ अशी नोटीस एमएमआरडीएने २ जून रोजी बजावली आहे. (प्रतिनिधी)