शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

निशिकोरी, रदवांस्का दुसऱ्या फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 03:08 IST

पाचव्या मानांकित जपानच्या केई निशिकोरीने पुरुष विभागात, तर महिलांमध्ये दुसऱ्या मानांकित पोलंडच्या अ‍ॅग्निस्का रदवांस्काने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून वर्षातील

पॅरिस : पाचव्या मानांकित जपानच्या केई निशिकोरीने पुरुष विभागात, तर महिलांमध्ये दुसऱ्या मानांकित पोलंडच्या अ‍ॅग्निस्का रदवांस्काने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून वर्षातील दुसऱ्या ग्रॅण्डस्लॅम फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत निशिकोरीने इटलीच्या सिमोन बोलेलीचा सलग दोन सेटमध्ये ६-१, ७-५, ६-३ ने पराभव केला. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत दुसऱ्या मानांकित रदवांस्काने सर्बियाच्या बोजाना जोवानोवस्कीचा ६-०, ६-२ ने धुव्वा उडवला. पुरुष विभागात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला अँडी मरे आणि चेक प्रजासत्ताकाचा ३७ वर्षीय रादेक स्टेपानेक यांच्यादरम्यानच्या लढतीत पावसाचा व्यत्यय निर्माण झाला. या लढतीत मरे सुरुवातीचे दोन्ही सेट गमावून पिछाडीवर होता. पावसाचा व्यत्यय आला त्या वेळी स्कोअर ३-६, ३-६, ६-०, ४-२ असा होता. अन्य लढतींमध्ये अनेक दिग्गजांना धक्कादायक निकालाला सामोरे जावे लागले. माजी यूएस ओपन चॅम्पियन व १०वे मानांकन प्राप्त मारिन सिलीचला अर्जेंटिनाचा खेळाडू मार्को ट्रुनगॅरेटीविरुद्ध ७-६, ३-६, ६-२, ६-२ ने पराभव स्वीकारावा लागला. महिला विभागात सातवे मानांकन प्राप्त इटलीची रॉबर्टा विन्सी व १६वे मानांकन प्राप्त सारा इराणी यांच्यासाठी वाईट दिवस ठरला. विन्सीला युक्रेनच्या कॅटरिना बोडारेन्कोने ६-१, ६-३ ने, तर २००२ची उपविजेती साराला बुल्गारियाच्या स्वेताना पिरोनकोव्हाने ६-३, ६-२ ने पराभूत केले. पुरुष विभागात अन्य लढतींमध्ये १६वे मानांकन प्राप्त फ्रान्सचा जाइल्स सिमोन, २२वे मानांकन प्राप्त व्हिक्टर ट्रोएकी यांनी पहिल्या विजयाची नोंद केली. सिमोनने ब्राझीलच्या रोगोरियो डुट्रा सिल्वाचा ७-६, ६-४, ६-२ ने, तर सर्बियाच्या ट्रोएकीने बुल्गारियाच्या गिग्रोर दिमित्रोव्हचा २-६, ६-३, ५-७, ७-५, ६-३ ने पराभव केला. बिगरमानांकित स्पेनच्या फर्नांडो बरदास्कोने ३३व्या मानांकित अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनचा ७-५, ६-४, ७-५ने, तर ३०वे मानांकन प्राप्त फ्रान्सच्या जर्मी चार्डीने अर्जेंटिनाच्या लियोनार्डो मेयरचा ६-४, ३-६, ६-४, ६-२ ने पराभव करून दुसरी फेरी गाठली. महिला एकेरीत पहिल्या फेरीत २५व्या मानांकित रोमानियाच्या इरिना बेगूने अमेरिकेच्या बेथानी मॅटेक सँड््सचे आव्हान ५-७, ६-१, ६-३ ने मोडून काढले. १७व्या मानांकित चेक प्रजासत्ताकाच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाला बिगरमानांकित अमेरिकन खेळाडू शैल्बी रॉजर्सविरुद्ध ३-६, ६-४, ६-३ ने पराभवाला सामोरे जावे लागले. सहाव्या मानांकित रोमानियाच्या सिमोना हालेपने जपानाच्या नाओ हिबिनोविरुद्ध ६-२, ६-० ने सहज विजय नोंदविला. (वृत्तसंस्था)