पेले... मॅराडोना... ख्रिस्तियानो रोनाल्डो... लिओनेल मेस्सी... एकापेक्षा एक सरस अशी फुटबॉलमधील ही दैैवतं... यापैकी कितीजणांना आपण प्रत्यक्ष पाहिलंय...? किंवा आपले भारतीय फुटबॉॅलपटू यांच्या विरोधात खेळलेत? दोन्ही प्रश्नांची उत्तर जवळपास आपणा साऱ्यांसाठी नाही अशीच असणार... बर नजिकच्या भविष्यात या दोन्ही गोष्टींची शक्यताही दुर्मिळ... मग असं असताना ज्या खेळात आपला देश २0९ देशांत १४६ व्या क्रमांकावर आहे... आपला एकही खेळाडू वर्ल्डकपचं काय प्रतिष्ठेच्या कोणत्याही फुटबॉल लीगमध्ये खेळत नाही तरीही फुटबॉल वर्ल्डकपची भारतात क्रेझ का? या उत्तर एकचं फुटबॉल हा खेळ नाहीय तर पॅशन आहे.... आणि या पॅशनपायीचे देशोदेशीच्या सीमारेषा पुसल्या जातात... मग रोनाल्डोही आपल्याला आपला वाटू लागतो अगदी सचिन तेंडुलकर इतकाच प्रिय... यंदाचा वर्ल्डकप गुरूवारपासून फुटबॉलची पंढरी ब्राझीलमध्ये सुरू होतोय... भारतीय वेळेनुसार मध्यरात्री मॅचेस रंगतील... थोडक्यात काय तर आजपासून भारतीय फुटबॉल शौकीन वर्ल्डकपसाठी रात्रीचा ‘दिवस’ करणार.मला मात्र रात्रीचा दिवस करण्याची संधी गमवावी लागणार आहे... कारण लोकमतच्या वाचकांसाठी थेट ब्राझीलहून माहिती देण्यासाठी मी रिओ द जनेरिओ गाठतोय... थेट रणभूमीवरून रणसंग्र्राम आणि आँखोदेखा हाल आपणासस याच सदरातून मिळावा म्हणून ही मोर्चेबांधणी... आजवर मी अथेन्स, बीजिंग आणि लंडन अशी तीन आॅॅलिम्पिक कव्हर केली... क्रिकेटचा वर्ल्डकप कव्हर करण्यासाठी २00७ ला थेट विंडीजही गाठलं... पण फुटबॉलचा हा महाकुंभ मेळा काही अजबचं आहे.... ब्राझील अक्षरशा हाऊसफुल झालय... आजवरचा माझा आॅलिम्पिक अथवा वर्ल्डकप कव्हर करतानाचा अनुभव असा असायचा की त्या त्या देशाचे पाठीराखे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी गर्दी करायचे... पण फुटबॉलची बातच काही और आहे... या खेळानं देशोदेशीच्या सीमा केव्हाच फुसल्यात... आणि म्हणूनच वर्ल्डकपमध्ये जगातील सर्वोत्तम ३२ संघ सहभागी होत असले तरी अवघे जग तिथे लोेटलय... जात-धर्म-पंथ-गरीब-श्रीमंत हे सारे भेद पुढील महिनाभर गळून पडणार आहेत... होणार तो फक्त आणि फक्त जल्लोष... हा जल्लोष कॅच करता यावा म्हणून गेली दोन वर्षे माझे प्लॅनिंग सुरू होते... फिफाच्या अधिकाऱ्यांशी अखंड पत्रव्यवहार पण तरीही त्यांनी अखेरपर्यंत दाद लागू दिली नाही. वुई हॅव प्लिज टू इन्फॉर्म यु अशा गोड शब्दात ते माझी नेहमी बोळवण करायचे. सरतेशेवटी अॅॅक्र्रीडेशन म्हणजे अधिकृत रिपोर्टींगसाठीची परवानगी अत्यंत हसमुख चेहऱ्यानं फिफाकडून मला नाकारण्यात आली. उत्तर सोपं होतं. आपला देश कुठं वर्ल्डकपसाठी पात्र ठरलाय. त्यामुळे अत्यंत कमी कोटा भारतीय पत्रकारांसाठी उपलब्ध होता. त्यांनी परवानगी नाकारली तरी माझा प्लन बी तयार होता... आॅन लाईन तिकिट खरेदी... तेथे मात्र मी गोल केलाच... आणि अखेर उपांत्यपूर्व फेरीपासून आता माझा मुक्काम असणार फुटबॉलची पंढरी ब्राझील. बरं तिकिट मिळाल्यावर मी वर्ल्डकप जिंकल्याच्या थाटात खूष होतो पण लागलीच माझ विमान जमीनीवर आदळलं... ब्राझील थेट गाठायचं असेल तर रिटर्न तिकीट तब्बल पावणेतीन लाख आणि स्वस्तातील सव्वा दोन लाखापर्यंतची तिकिट हवी असेल तर जगभर फिरा... म्हणजे माझ्याबाबतीत मी आधी दक्षिण अफ्रिकेला जाणार, तेथून साओपावलोला येणार मग तेथून सॅल्व्हाडोर आणि नंतर रिओ... विमान प्रवास फक्त ३२ तासांचा... (त्यात विमानतळावरील प्रतीक्षा वेळही आलीच) हा एवढा खटाटोप मी आपल्यासमोर मांडण्याचं कारण हेच की पूर्वी जसं म्हटलं जायचे आॅल रोड लीड टु रोम तसे आता आॅल रोड टू ब्राझील झालंय.... त्याला कारणही तसंच आहे.... ब्राझील हा एकमेव देश आहे जो आजवर खेळल्या गेलेल्या सगळ्याच्या सगळ्या २0 वर्ल्डकपसाठी पात्र ठरलाय.... सर्वाधिक पाच वेळा ब्राझिलनं वर्ल्डकप जिंकलाय. त्यातही पेलेच्या ब्राझील संघानं १९५८, ६२ आणि ७0 असं तीन वेळा वर्ल्ड जिंकण्याची किमया केलीय. त्यात पेलेच्या देशात हा वर्ल्डकप होतोय. थोडक्यात फुटबॉलच्या विठ्ठलाचं दर्शन तेही फुटबॉलच्या पंढरीत ब्राझीलमध्ये आणि वर्ल्डकपच्या निमित्तानं... असा हा दुग्धशर्करा योग आहे.अबब कोटीच्या कोटी!भारत हा क्रिकेट वेडा देश.... २0११ चा वर्ल्डकप भारतानं जिंकला. या विजेतेपदासाठी भारतीय संघास मिळाले १३ कोटी रूपये... ब्राझीलमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपच्या बक्षिसाच्या रक्कमेवर नजर टाकली तर क्रिकेटचा वर्ल्डकप म्हणजे गल्ली क्रिकेट वाटू लागतं... यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये ३२ टीम पात्र ठरल्यात. त्यातील गटातच बाद होणाऱ्या १६ टीमला केवळ पात्र ठरलेत म्हणून मिळणार आहेत प्रत्येकी ४७ कोटी ३८ लाख रूपये. त्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीतील पराभूत ८ संघांना मिळणार प्रत्येकी ५२ कोटी रूपये. उपांत्यपूर्व फेरीतील पराभूत ४ संघांना मिळणार ८२ कोटी २९ लाख रूपये प्रत्येकी. चौथ्या क्रमांकावरील संघाला ११८ कोटी ४५ लाख. तिसऱ्या क्रमांकावरील संघास १३0 कोटी तर दुसऱ्या क्रमांकावरील म्हणजेच उपविजेत्या संघास १४८ कोटी रूपये. आता विचार करा, ब्राझीलमध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघास किती बक्षीस रक्कम मिळेल... तब्बल २0७ कोटी रूपये. म्हणजेच क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाले तर तब्बल १६ वेळा क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकल्यावर जितकी रक्कम मिळेल तितकी रक्कम फक्त यंदाचा ब्राझील वर्ल्डकप जिंकल्यावर विजेत्या संघास मिळणार आहे. आणि अशा ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होण्यासाठी इकडे भारतात फुटबॉल शौकिनांनी रात्रीचा दिवस केला तर बिघडलं कुठं... एका सर्व्हेनुसार एकूण जगाच्या लोकसंख्येच्या ११ टक्के लोख फुटबॉलचा वर्ल्डकप बघतात. तुम्ही त्यापैकीच एक असणार आहात...सारं काही आलबेल नाहीय... आतापर्र्यत आपण फुटबॉलची एकच बाजू पाहिलीय. दुसरी बाजू ही आहे की अवघं जग जरी ब्राझीलमधील फुटबॉलसाठी उत्सुक असलं तरी खुद्द ब्राझीलमध्ये या वर्ल्डकपच्या आयोजनाविरूद्ध प्रचंड जनक्षोभ आहे. व तो दिवसागणिक वाढतोय. एक सर्व्हेनुसार तब्बल ६.१ टक्के ब्राझील वासियांना वर्ल्डकपचं आयोजन रूचलेलं नाही. वर्ल्डकपवरील हा अब्जावधी रूपयांचा खर्च इतर पायाभूत सुविधांवर खर्च करता आला असता असं त्याचं म्हणणं आहे. १९९४ मध्ये ब्राझीलला फुटबॉल वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारा आणि आता राजकीय नेता असणारा रोमरिओनंही या वर्ल्डकप संयोजनावर तोफ डागलीय. त्यामुळे विरोधाची धार बोथट होण्यापेक्षा अधिक तेज होतेय...२00३ साली ग्रीसमधील अथेन्समध्ये आॅलिम्पिक झालं होते तेव्हाही हीच ओरड होती. आज ग्र्रीस देश दिवाळखोरीत निघालाय. ब्राझीलमध्ये दर दोन वर्षांनी पुन्हा आॅलिम्पिक होऊ घातलंय. त्यामुळे ही ओरड तीव्र होत चाललीय. असं असंल तरी खेळाला विषय निघालाच की राज्यकर्त्यांना दोन इरसाल शिव्या हासडल्या की पुन्हा मूळ ब्राझीलियन खेळावर भरभरून बोलतो. नेयमार हा यंदाचा त्यांचा स्टार फुटबॉलपटू आहे. त्याच्याकडून त्यांना खूप अपेक्षा आहे...
फुटबॉलसाठी आजपासून रात्रीचा ‘दिवस’
By admin | Updated: June 12, 2014 04:45 IST