शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

न्यूझीलंडची सरशी

By admin | Updated: December 15, 2015 01:37 IST

न्यूझीलंडने सोमवारी पाचव्या अखेरच्या दिवशी संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा १२२ धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने श्रीलंकेपुढे विजयासाठी ४०५ धावांचे

ड्युनेडिन : न्यूझीलंडने सोमवारी पाचव्या अखेरच्या दिवशी संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा १२२ धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने श्रीलंकेपुढे विजयासाठी ४०५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. श्रीलंकेकडे लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पुरेसा अवधी होता, पण त्यांच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. श्रीलंकेचा दुसरा डाव पाचव्या व अखेरच्या दिवशी उपाहारानंतर २८२ धावांत संपुष्टात आला. श्रीलंकेचे आघाडीचे दोन फलंदाज दिनेश चांदीमल व कर्णधार अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज यांनी सुरुवातीला काही वेळ संघर्षपूर्ण खेळ करीत चौथ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. पण, तीन षटकांच्या अंतरात हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर न्यूझीलंडचा विजयाचा मार्ग प्रशस्त झाला. मॅथ्यूजला (२५) नील वॅगनरने क्लीन बोल्ड केले. तर, १७ चेंडूंनंतर मायकल सँटनरने श्रीलंकेतर्फे सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या चांदीमलला (५८) तंबूचा मार्ग दाखवला. न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध गेल्या तीन वर्षांत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅन्डन मॅक्युलमने दुसरा डाव ३ बाद २६७ धावसंख्येवर घोषित करण्याचा धाडसी निर्णय घेतल्यानंतर, श्रीलंकेकडे ४०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पाच सत्रांपेक्षा अधिक कालावधी होता. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका संघाने चौथ्या दिवसअखेर ३ बाद १०९ धावांची मजल मारली होती. पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेलेल्या वेळेची भरपाई करण्यासाठी सोमवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी खेळ निर्धारित वेळेच्या अर्ध्या तासापूर्वी सुरू झाला. श्रीलंका संघाला त्या वेळी लक्ष्य गाठण्यासाठी २९६ धावांची गरज होती. श्रीलंका संघाची आशा अनुभवी फलंदाज चांदीमल व मॅथ्यूज यांच्यावर केंद्रित होती. न्यूझीलंडने ही भागीदारी संपुष्टात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. ट्रेन्ट बोल्टने ग्रीपमध्येही बदल केला. वर्षभराच्या कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या वॅगनरने मॅथ्यूजविरुद्ध सलग दोन बाऊन्सरचा मारा करीत भागीदारी संपुष्टात आणण्याचा पाया रचला. श्रीलंकेच्या कर्णधाराला तिसरा चेंडू आखूड टप्प्याचा येईल, अशी आशा होती; पण वॅगनरने फुललेंथ चेंडू टाकताना मॅथ्यूजचा त्रिफळा उडवला. त्यानंतर लगेच सँटनरने चांदीमलला पायचीत करीत दुसरा धक्का दिला. कितुरुवान वितांगेने आक्रमक पवित्रा स्वीकारला. टीम साऊदीच्या गोलंदाजीवर पायचीत होण्यापूर्वी वितांगेने ३८ धावांची खेळी केली. त्यात चार चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. उपाहाराला खेळ थांबला त्या वेळी श्रीलंकेची ६ बाद २२४ अशी अवस्था होती. त्यानंतर उर्वरित चार विकेट ११ षटकांत ५८ धावांच्या मोबदल्यात माघारी परतल्या. न्यूझीलंडतर्फे साऊदीने ५२ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले, तर बोल्ट, वॅगनर व सँटनर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड (पहिला डाव) : ४३१. श्रीलंका (पहिला डाव) : २९४. न्यूझीलंड (दुसरा डाव) : ३ बाद २६७ (घोषित). श्रीलंका (दुसरा डाव) : ९५.२ षटकांत सर्वबाद २८२. (दिनेश चंडीमल ५८, मेंडिस ४६,विथांगे ३८, सिरिवर्धना २९, करुणारत्ने २९. टीम साऊथी ३/५२, मिशेल सँटनेर २/५३, नील वॅग्नर २/५६, ट्रेंट बोल्ट २/५८).